निम्म्याहून कमी लाईट बिल येईल, फक्त 200 रुपयांचे हे उपकरण बसवा

एका डिव्हाईसबाबत सांगणार आहोत जे घरातील लाईट मीटरसोबत जोडू शकता.   

Updated: Oct 8, 2022, 08:02 PM IST
निम्म्याहून कमी लाईट बिल येईल, फक्त 200 रुपयांचे हे उपकरण बसवा title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : परतीचा पाऊस सुरु झाला असून आता वेध लागलेत ते हिवाळ्याचे. हिवाळ्यात अनेक जण गरम पाण्याने अंघोळ करतात. पाणी गरम करण्यासाठी हीटर किंवा गीझरचा (heater and geyser) वापर केला जातो. त्यामुळे लाईट बील (Lite Bill) जास्त येतं.  सातत्याने येणारं जास्तीचं लाईट बील ही अनेकांची समस्या आहे. मात्र आम्ही तुम्हाला एका डिव्हाईसबाबत सांगणार आहोत जे घरातील लाईट मीटरसोबत जोडू शकता. (electricity bill will start coming less than half now install this device)

Saimax SAI3G Power Saver (White) हे एक असं डिव्हाईस आहे, जे वीज बिल कमी येण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. हे डिव्हाइस घरातही बसवू शकता. पण ते घरात बसवण्याआधी इंजिनीअरला विचारायला हवे. डिव्हाइस कंपनीचा दावा आहे की, हे विजेची 40 टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. त्यामुळे तुमचे वीज बिलही कमी येईल.

डिव्हाइसची किंमत किती?

फ्लिपकार्टवरून हे डिव्हाइस ऑर्डर करू शकता. हे डिव्हाइस फेज 1 वर कार्य करतं. त्यामुळे वीज आणि वीज बिल दोन्ही वाचवणे शक्य होते. हे डिव्हाइस 7 दिवसांच्या बदली करुन  (7 Days Replacement Policy) दिलं जात आहे. डिव्हाइस लावल्यानंतर शॉर्ट सर्किट झालं तर ते डिव्हाइस परत घेतलं जाणार नाही. तसंच उत्पादनात दोष आढळल्यासही परत घेतले जाणार नाही, असं कंपनीचं म्हणंन आहे.