मुंबई : चायनीज हँडसेट मेकर कंपनी ओप्पो (Oppo) आपल्या स्मार्टफोनवर 4G डेटा फ्री ची ऑफर घेऊन आली आहे.
कंपनी यासाठी आपले पार्टनर असलेल्या रिलायन्स जिओसोबत ही स्कीम घेऊन येत आहे. या स्कीमसोबत युझर्स ओप्पोचा नवा स्मार्टफोन खरेदी करून ३९९९ रुपयांपेक्षा अधिक रुपयाचं रिचार्ज करतात. मात्र आता त्यांना जिओकडून १०० जीबी पर्यंतचा 4G डेटा अधिक दिला जाणार आहे. त्यामुळे आता ग्राहक प्लानसोबत मिळणाऱ्या या डेटासोबत एक्स्ट्रा डेटा एन्जॉय करू शकतात.
ओप्पोचे भारतातील ब्रांड डायरेक्टर विल यांग यांनी सांगितले आहे की, युझर्सला समाधानी करणे आणि चांगली सेवा देणे याकडे कंपनी फोकस करते. आम्ही अधिक युझर्सकडे पोहोचून ही सेवा देण्यात उत्सुक आहोत. कंपनीने जीओसोबत ही ऑफर ओप्पोच्या 4G स्मार्टफोन सिरीजवर देऊ केली आहे.
ओप्पोने भारतात आपला नवा स्मार्टफोन Oppo F3 Plus लाँच केला आहे. हा फोन ६ जीबी रॅम वेरिएंटसोबत लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सेल्फी फोकस आहे. याची किंमत २२ हजार ९९० रुपये असून युझर्स हा फोन १६ नोव्हेंबरपासून खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.