Galaxy S23 Ultra : Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा इतका अप्रतिम फोटो काढला की... Elon Musk ही शॉक झाले

 Samsung Galaxy S23 Ultra या मोबाईलफोनवरुन काढलेला फोटो एलॉन मस्क (Elon Musk) यांना खूपच आवडला. एलॉन मस्क यांनी कॅमेरा क्वालिटीचे कौतुक केले आहे. 

Updated: Feb 7, 2023, 09:58 PM IST
Galaxy S23 Ultra : Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा इतका अप्रतिम फोटो काढला की... Elon Musk ही शॉक झाले

Elon Musk On Galaxy S23 Ultra : एका व्यक्तीने Galaxy S23 Ultra या मोबाईलमधून चंद्राचा अप्रतिम फोटो काढला आहे.  Samsung च्या या लेटेस्ट मोबाईल फोनची कॅमेरा क्वालिटी पाहून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क ( Elon Musk) देखील शॉक झाले आहेत. एका व्यक्तीने Samsung Galaxy S23 Ultra या मोबाईलफोनवरुन फोटो काढतानाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता.  एलॉन मस्क यांनी या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.

मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर मार्क्स ब्राउनली या अमेरिकन यूट्यूबरने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी Samsung Galaxy S23 Ultra या मोबाईलवरून चंद्राचा फोटो 100x झुम वर क्लिक केल्यावर तो कसा दिसतो हे दाखवले. हा फोटो क्लिक करतानाचा व्हिडिओ आहे. 

100x झुम वर क्लिक केल्यानंतर Samsung Galaxy S23 Ultra या मोबाईलवर क्लिक केलेला फोटो अतिशय अप्रतिम असा आला आहे. Samsung Galaxy S23 Ultra या मोबाईलवरुन काढलेल्या फोटोसमोर DSLR कॅमेऱ्यामधून काढलेले फोटोही फेल ठरतील. ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओवर एलॉन मस्क यांनी  "wow" अशी कमेंट केली आहे.

200MP कॅमेरा सेन्सर  

Samsung Galaxy S23 Ultra या फोनमध्ये तब्बल  200MP कॅमेरा सेन्सर आहे. यात एडेप्टिव पिक्सल्स आहेत. यामुळे फोटो अतिशय चांगल्या क्वालीटीमध्ये कॅप्चर होतो.  Super Quad Pixel AF मुळे कॅमेरा 50 टक्के फोकस करतो असा दावा कंपनीने केला आहे. या फोनच्या फ्रंट कॅमऱ्यामध्ये देखील डुअल पिक्सल ऑटोफोकस टेक्नोलॉजी आहे. या फोनमध्ये Nightography मोड देखील आहे. यामुळेच रात्रीच्या वेळी देखील एकदम क्लिअर फोटो येतात. अलीकडेच सॅमसंग मोबाईलने  Galaxy S23 सीरीजचे फोल लाँच केले. यापैकी Samsung Galaxy S23 Ultra हा सर्वात लेटेस्ट आणि टॉप माॉडेल आहे. 

Samsung Galaxy S23 Ultra या फोनचे बेस्ट फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

- Samsung Galaxy S23 Ultra 5G मध्ये सीक्युरिटीसाठी कंपनीने प्रथमच Gorilla Glass Victus 2 चा वापर केला आहे. 
- 1-120Hz च्या डायनॅमिक रिफ्रेश रेटसह 6.8-इंच एज क्वाडएचडी+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले
-  गेम मोडमध्ये डिस्प्लेला 240Hz टच सॅम्पलिंग रेट मिळतो.
- Android 13 वर आधारित One UI 5.1 ओपरेटिंग सिस्टम
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 प्रोसेसर
- 2GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज 
- फोनच्या मागील पॅनलवर क्वाड रियर कॅमेरा सेटअप
- 200 मेगापिक्सेल प्राइमरी वाइड कॅमेरा सेन्सरसह 12 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स
- 10 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर 3x ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा सेन्सर आणि 10X ऑप्टिकल झूमसह 10 मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा सेन्सर
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर
-  5000 mAh बॅटरी
- 15 W फास्ट वायरलेस चार्जिंग, 20 मिनिटांत 65 टक्के फोन चार्ज होणार
- या फोनची किंमत जवळपास 98 हजार रुपये इतकी आहे.