‘गूगल’ची अशीही बनवाबनवी, २४२ कोटींचा युरो दंड

इंटरनेजच्या जगतात जी माहिती आपल्या तात्काळ हवी असेल तर सगळेच जण गूगलचा वापर करतात. गूगल सर्चमध्ये जो शब्द टाकाल त्याची माहिती काही सेकंदात तुम्हाला उपलब्ध होते. मात्र, गूगलने बनवाबनवी केल्याने त्यांना जबर दंड ठोठावण्यात आलाय. तब्बल २४२ कोटी युरोचा दंड करण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 27, 2017, 11:53 PM IST
‘गूगल’ची अशीही बनवाबनवी, २४२ कोटींचा युरो दंड   title=

वॉशिंग्टन  : इंटरनेजच्या जगतात जी माहिती आपल्या तात्काळ हवी असेल तर सगळेच जण गूगलचा वापर करतात. गूगल सर्चमध्ये जो शब्द टाकाल त्याची माहिती काही सेकंदात तुम्हाला उपलब्ध होते. मात्र, गूगलने बनवाबनवी केल्याने त्यांना जबर दंड ठोठावण्यात आलाय. तब्बल २४२ कोटी युरोचा दंड करण्यात आलाय.

गूगलने इंटरनेटवर प्रतिस्पर्धी उत्पादने आणि सेवा डावलून आपल्या उत्पादनाना प्राधान्य दिल्याप्रकरणी यूरोपियन युनियनने गूगलला २४२   कोटी युरोंचा दंड ठोठावला आहे.  यूरोपीयन युनियन महासंघाच्या ( EU) नियामक समितीने ही कावाई करत गूगला जोरदार दणका दिलाय. 

सध्याच्या घडीला इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधण्यासाठी गूगल हे सर्च इंजिन सर्रासपणे वापरले जाते. त्यामुळे हे सर्च इंजिन बरेच लोकप्रिय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गूगलकडून स्वत:ची उत्पादने आणि सेवांना प्राधान्य देण्यासाठी सर्च इंजिनमध्ये काही फेरफार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही गूगलची बनवाबनवी त्यांनाचा डोकेदुखी ठरली.

गूगलकडून सर्च इंजिनमध्ये इतर उत्पादनांची माहिती दडवून स्वत:ची उत्पादने आणि सेवांना मोक्‍याची जागा दिली जाते. या कारवाईमुळे गूगलची पॅंरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटला मोठा फटका बसलाय.

अमेरिकेच्या येल्प, ट्रिप अॅडव्हाईझर, इंग्लंडच्या फाऊंडेम आणि फेअर सर्च या कंपन्यांनी गूगलविरोधात तक्रार दाखल केली होती. गेल्या सात वर्षांपासून या संदर्भातील तपास सुरू होता. गूगलने येत्या तीन महिन्यांत सर्च इंजिनमध्ये फेरफार करणे थांबवावे, असा इशाराही देण्यात आला आहे. अन्यथा अल्फाबेट कंपनीला दिवसाकाठी मिळणाऱ्या जागतिक उत्त्पन्नाच्या ५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागेल, असा कडक इशार देण्यात आलाय.