Facebook Users : फेसबुक (Facebook) हे आता जगभरात लोकप्रिय ठरत असलेले तसेच सर्वाधिक वापरकर्ते असलेले सोशल मीडिया (Social media) माध्यम ठरत आहे. दिवसेंदिवस फेसबुकच्या युजर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच फेसबुकने एक फिचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे युजर्सला दुसर्या फेसबूक युजर्सला आपले करंट लोकेशन दाखवत येणार नाही. नेमकं काय आहे निर्णय याबाबत जाणून घेऊया...
फेसबुकवर हे फिचर बंद होणार
फेसबुक आपल्या प्लेटफॉर्मवर एक निअरबी फ्रेंडस् फीचर देते जे युजर्सला दुसर्या फेसबूक युजर्ससोबत आपले करंट लोकेशन दाखवत असते. मात्र पुढील महिन्यात ते फिचर्स लोकांना वापरता येणार आहे. Neighborhoods नावाचे हे फिचर आहे. हे हायपरलोकल फिचर्स आहे. याला 1 ऑक्टेबर पासून बंद करण्यात येणार आहे. या फिचर्सच्या माध्यमातून लोक एकमेकांना कनेक्ट राहत होते.
याशिवाय तसेच तो त्याच्या क्षेत्रातील नवीन ठिकाणे देखील शोधू शकतो आहे. हा स्थानीक कम्युनिटीचा एक भाग आहे. या फिचर्सला पहिल्यांदा कॅनडा आणि अमेरीका यांसारख्या देशात 2022 मध्ये बंद केले आहेत. यामध्ये वापरकर्त्यांकडे पर्याय होता, ते सेवेत सहभागी होऊन स्वतंत्र प्रोफाइल तयार करू शकत होते. कंपनी सध्या कॉस्ट कटिंगवर काम करत आहे. याचा कंपनीला नक्कीच फायदा होईल. आणि Neighborhoods बंद केल्या नंतर कंपनीच्या भागधारकांना विषेश तोटाही होणार नाही. त्यामुळेच कंपनी हे फिचर्स बंद करणार आहे.
कंपनी कडून सांगण्यात आले आहे की Neighborhoods ला लॉच करण्याचा हेतू हा होता की स्थानीक कम्युनीटीला एकत्र आणने. पण नंतर कंपनीला समजल की हे साध्य करण्यासाठी ग्रुप्स हाच चांगला पर्याय आहे. यासाठी कंपनीने काही मार्गदर्शक तत्त्वे पण तयार केली आहेत. त्यानंतर 1 ऑक्टोबर पासून ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.