Facebook वर चुकूनही 'ही' नाव सर्च करु नका, जावं लागेल तुरुंगात

Social media: सोशल मीडियातील फेसबुक प्लॅटफॉर्म सध्या सर्वजणच वारतात. परंतु, त्यावर काहीही सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते. अशी कोणती नावे आहेत जी सर्च केला तर तुम्हाला महागात पडू शकतात.

Updated: Feb 1, 2023, 06:09 PM IST
Facebook वर चुकूनही 'ही' नाव सर्च करु नका, जावं लागेल तुरुंगात  title=

Facebook Users: झोपेतून उठल्यापासून ते अगदी दिवस संपताना पुन्हा झोपेपर्यंत सातत्यानं सध्याची पिढी मोबाईलसमोर असते. त्यातच अनेकजण फेसबुक, इंन्स्टा यासारख्या अॅपवर तासनतास घालवतात. मात्र Social Media चा वापर करीत असाल तर त्याची नियम सुद्धा माहिती हवीत. कारण फेसबुकवर काहीही सर्च करीत असाल तर तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागू शकते. कारण, अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या कायद्याने गुन्हा ठरतात. त्यामुळे याचा थेट अर्थ आहे की, तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्यास तुम्हाला थेट जेलची शिक्षा होवू शकते. जाणून घ्या संदर्भातील सविस्तर बातमी....

Offensive photos

तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून एखादी व्यक्ती, संस्था, समुदायाविषयी आक्षेपार्ह फोटो शेअर करता तरी तुम्हाला जेल होऊ शकते. फेसबुक बहुतांश प्रकरणी अशा पोस्ट किंवा असे अकाऊंट ब्लॉक करतं (Photo).

Illegal Video

कोणताही व्हिडिओ शेअर करणे किंवा पाहणे कायद्याने गुन्हा आहे. जो बेकायदेशीर गटात येत असेल. यात अनेक प्रकारच्या व्हिडिओचा समावेश आहे. यात समाजाला नुकसान पोहोचवणाऱ्या व्हिडिओचा समावेश आहे.

वाचा: मोबाईल, टीव्ही स्वस्त की महाग जाणून घ्या सविस्तर...

Fake News

फेक बातम्या रोखण्यासाठी सरकार अनेकदा पावलं उचलत आहेत. याच कारणामुळे तुम्हाला फेक न्यूज संबंधी खूप अलर्ट राहणे गरजेचे आहे. कोणतीही बातमी शेअर करण्याआधी व्हेरिफाय करणे गरजेचे आहे. IT Act अंतर्गत जर कोणी फेक न्यूज शेअर करीत असेल तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जावू शकतो. 

Child Pornography

Child Pornography संबंधी एक कायदा आहे. जर तुमच्याकडे असा कोणताही व्हिडिओ येत असेल तर त्याला तुम्ही चुकूनही पाहू नका. कारण, असे केल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होवू शकतो. तसेच यासंबंधी चुकूनही काधीही फेसबुकवर सर्च करू नका. यासंबंधी अलर्ट राहणे खूप गरजेचे आहे. हे सर्व कायद्याने बेकायदेशीर आहे.

Facebook Post 

तुम्ही अशी एखादी पोस्ट (Facebook Post) लिहिता ज्यामध्ये कोणा एका व्यक्तिविरोधात अभद्र भाषेचा वापर करता किंवा त्या पोस्टमधून काही नियमांचं उल्लंघन होत आहे तर तुमच्यावर अर्थात ती पोस्ट करणाऱ्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.