आता, टोलनाका टाळण्यासाठी 'फास्टॅग' खरेदी करा 'अमेझॉन'वर

'माय फास्टॅग' या मोबाईल ऍपमध्ये उपभोक्ता आणि वाहनाची विस्तृत माहिती देऊन फास्टॅग सक्रीय केला जातो

Updated: May 30, 2019, 04:16 PM IST
आता, टोलनाका टाळण्यासाठी 'फास्टॅग' खरेदी करा 'अमेझॉन'वर title=

नवी दिल्ली : कोणत्याही अडथळ्याशिवाय वाहतूक करण्यासाठी आणि डिजिटल टोल व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) पुढे आलंय. टोलनाक्यावर वापरले जाणारे 'फास्टॅग' आता तुम्हाला अमेझॉनवरही खरेदी करता येणार आहेत. हे 'फास्टॅग' तुम्ही रिचार्ज करू शकता. या माध्यमातून टोल नाक्यांवर टोल आपोआप भरला जाईल. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) फास्टॅग चार चाकी गाड्यांसाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत. यापुढे फास्टॅग ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवरही उपलब्ध राहतील. ऑनलाईन एनएचआय फास्टॅग स्वयं कार्य करण्याच्या (डू इट युअरसेल्फ) कल्पनेच्या आधारावर तयार करण्यात आलंय. 

'माय फास्टॅग' या मोबाईल ऍपमध्ये उपभोक्ता आणि वाहनाची विस्तृत माहिती देऊन फास्टॅग सक्रीय केला जातो. यानंतर उपभोक्त्यांना आपल्या बँकेच्या खात्याशी हे टॅग जोडावे लागतील. 

सध्या, फास्टॅग बँक खात्याशी जोडण्याची सुविधा सात बँकांद्वारे देण्यात आलीय. यामध्ये एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, पेटीएम पेमेटस् बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्शिअल बँक यांचा समावेश आहे. 'एनएचएआय'द्वारे भारतीय राजमार्ग प्रबंधन कंपनी लिमिटेडनं जानेवारी २०१९ मध्ये फास्टॅग सादर केले होते. 

राजमार्ग प्राधिकरणानं फास्टॅगसाठी कोणत्याही बँकेला निवडलेलं नाही. 'माय फास्टॅग' हे मोबाईल ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.