दसऱ्यानिमित्त Flipkart चा नवीन सेल, अनेक वस्तूंवर मिळतोय इतका Discount

फ्लिपकार्टचा नवीन सेल, ऑफर पाहून तुम्ही वस्तू खरेदी केल्याशिवाय राहणार नाही

Updated: Oct 2, 2022, 06:07 PM IST
दसऱ्यानिमित्त Flipkart चा नवीन सेल, अनेक वस्तूंवर मिळतोय इतका Discount

मुंबई : सणासुदीनिमित्त अनेक ई-कॉमर्स साईट्सनी भरघोस डिस्काऊंट द्यायला सुरुवात केली आहे. या भरघोस डिस्काऊंटचा फायदा ग्राहकांना होतोय. आता असाच एक नवीन सेल फ्लिपकार्ट (Flipkart) घेऊन आलीय. या सेलमध्ये ग्राहकांना मोठा डिस्काऊंट मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्या ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज (Big Billion Days Sale) सेलचा लाभ घेतला नसेल, त्यांना या सेलचा लाभ घेता येणार आहे. 

फ्लिपकार्टचा बिग दसरा सेल 2022 (Flipkart Big Dussehra Sale 2022) जाहीर झाला आहे. या सेलला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. हा सेल सलग तीन दिवस म्हणजे 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.दरम्यान जर तुम्ही फ्लिपकार्टच्या (Flipkart) बिग बिलियन डेज (Big Billion Days Sale) सेलचा लाभ घेतला नसेल तर तुम्हाला या बिग दसरा सेलचा लाभ घेता येणार आहे.  

'या' वस्तुंवर इतके टक्के सुट
फ्लिपकार्टचा (Flipkart) बिग दसरा सेल (Flipkart Big Dussehra Sale 2022)  5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र फ्लिपकार्ट प्लस सदस्य असणाऱ्यांना एक दिवस आधी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी या सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. या सेलबाबत कंपनीने म्हटले आहे की, सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मोबाईल फोनवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. टीव्ही आणि गृहोपयोगी वस्तूंवर 75% पर्यंत सूट दिली जाणार आहे.  

स्मार्टफोनवर मोठी सुट 
बिग दसरा सेलमध्ये (Flipkart Big Dussehra Sale 2022) अनेक वस्तुंवर मोठी सुट देण्यात येणार आहे. यामध्ये स्मार्टफोनचाही समावेश आहे.स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर Realme, Poco, Samsung, Oppo, Vivo, Apple, Xiaomi सारख्या ब्रँडच्या मोबाईलवर मोठी सूट दिली जाईल.

गिफ्ट व्हाउचर
जर तुम्ही फ्लिपकार्ट (Flipkart) बाय नाऊ पे लेटरद्वारे पेमेंट केल्यास, तुम्हाला 500 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळणार आहे. याशिवाय सेलमध्ये 199 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मोबाइल प्रोटेक्सन प्लान देखील घेऊ शकतात.

डिस्काऊंटसह इतर ऑफर  
फ्लिपकार्टवर (Flipkart) डिस्काऊंटसह इतर ऑफरही मिळणार आहेत. जसे तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळतील. या सेल दरम्यान, HDFC बँक कार्ड वापरकर्त्यांना सूट दिली जाईल. यामध्ये यूजर्सना सुलभ ईएमआय ऑफर देखील देण्यात येणार आहेत.

दरम्यान जर तुम्ही फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलला (Big Billion Days Sale) लाभ घेतला नसेल, तर फ्लिपकार्टचा बिग दसरा सेल (Flipkart Big Dussehra Sale 2022) तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.