Google Chrome: गुगल क्रोम या लोकप्रिय सर्चिंग ब्राउझरच्या वापराबाबत सरकारने अलर्ट जारी केला आहे. नॅशनल सायबर एजन्सी CERT-In ने म्हटले आहे की, Google Chrome चा वापर धोकादायक ठरू शकतो. भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोमच्या काही डेस्कटॉप आवृत्त्यांमधील अनेक सुरक्षा त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. या टीमचे म्हणणे आहे की हॅकर्स या असुरक्षिततेचा फायदा घेऊन वापरकर्त्याचा संगणक हॅक करू शकतात.
तुम्ही हे क्रोम ब्राउझर वापरत असाल तर काळजी घ्या अन्यथा हॅकर्स तुमची वैयक्तिक माहिती, बँक तपशील काढू शकतात आणि तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.
सीईआरटी-इन अहवाल काय म्हणतो?
-गुगल क्रोम 106.0.5249.61 आणि त्यावरील आवृत्ती वापरणे धोकादायक ठरू शकते.
-Mac/linux आणि windows 106.0.5249.61/62 आवृत्ती देखील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चांगली नाही.
गुगल क्रोममध्ये काय त्रुटी आढळल्यात?
SERT-In च्या अॅडवायजरीनुसार, Google Chrome मध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन, हॅकर्स तुमच्या सिस्टमवर क्राफ्टेड रिक्वेस्ट अटॅकर्स आर्बिटरी कोड एक्झीक्यूट करु शकतात. हा कोड तुमच्या कॉम्प्युटरच्या सुरक्षिततेला बायपास करू शकतो आणि तुमची सिस्टम पूर्णपणे हॅक करू शकतो.
याआधी SERT-In ने Apple iOS, Apple iPad आणि MacOS च्या बग्सबाबत असा अलर्ट दिला होत. अॅपल उपकरणांच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक बग आहे, ज्याचा हॅकर्सकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. यानंतर अॅपलने आपल्या यूजर्सला तात्काळ इमरजेंसी अपडेट अपडेट करण्यास सांगितले.
वाचा : विहिरीचा आकार गोलच का असतो? जाणून घ्या शास्त्रीय कारण!
सुरक्षिततेसाठी काय कराल?
हॅकिंग टाळण्यासाठी, वापरकर्त्यांना प्रथम त्यांचे Google Chrome चे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच, वापरकर्त्यांनी अज्ञात लिंकवर क्लिक करणे आणि अनोळखी वेबसाइटला भेट देणे टाळावे.