फ्लिपकार्टवर ऑनर डे सेल, 'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळवा ९ हजारांची सूट

 या स्मार्टफोनसह आणखी स्मार्टफोनवरही आकर्षक सूट देण्यात आली आहे.

Updated: Feb 1, 2019, 02:23 PM IST
फ्लिपकार्टवर ऑनर डे सेल, 'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळवा ९ हजारांची सूट title=

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर ऑनर स्मार्टफोन खरेदी केल्यास मोठी सूट मिळणार आहे. 'ऑनर १० लाइट', 'ऑनर' ९ एन, 'ऑनर' १० या स्मार्टफोनसह आणखी स्मार्टफोनवरही आकर्षक सूट देण्यात आली आहे. हा सेल ३१ जानेवारीला 'फ्लिपकार्ट'वर सुरु करण्यात येणार आहे.

'ऑनर' ८ लाईट स्मार्टफोन ( ३जीबी रॅम, ३२ जीबी स्टोअरेज) ८ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनवर फ्लॅट डिस्काउंट देण्यात आले आहे. ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोअरेज असलेल्या स्मार्टफोनवर ३ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. 'ऑनर' १० स्मार्टफोनची किंमत ३५ हजार ९९९ रुपये आहे. परंतु,ऑनर सेल दरम्यान हा स्मार्टफोन ३२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे.

'ऑनर' ९ एन ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोअरेज असलेला स्मार्टफोन १० हजार ४९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. ( ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोअरेज) हा स्मार्टफोन ८ हजार ४९९ रुपयांत मिळणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनवर ५००० रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट देण्यात येणार आहे.  ऑनर ७ए आणि ऑनर ७एस या दोन्ही स्मार्टफोनवर ३ हजारांची सूट मिळणार आहे.