6 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजची सुरुवात; इलेक्ट्रॉनिक्सवर ५० टक्के सूट, बंपर ऑफर्स

मोबाईल्सवर 40 टक्के सूट तर टीव्हीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट...

Updated: Aug 2, 2020, 11:18 AM IST
6 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजची सुरुवात; इलेक्ट्रॉनिक्सवर ५० टक्के सूट, बंपर ऑफर्स

नवी दिल्ली : फ्लिपकार्टचा Flipkat Big Saving Days 2020 सेल होणार आहे. या सेलमध्ये ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि इतर काही गोष्टींवर मोठी सूट मिळणार आहे. 6 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजची सुरुवात होणार आहे. 5 दिवस चालणाऱ्या या सेलचा शेवटचा दिवस 10 ऑगस्ट असणार आहे. 

फ्लिपकार्टच्या प्लस मेंबर्सला 5 ऑगस्ट, संध्याकाळी 8 वाजता अर्ली ऍक्सिस मिळणार आहे. सिटी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स, आयसीआयसीआय कार्ड्सवरुन शॉपिंग करणाऱ्यांना 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे. या सेलमध्ये प्रत्येक 6 तासांनी ब्लॉक बस्टर डिल्स मिळणार आहेत. ज्यात मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवर ऑफर्स मिळणार आहेत. विशेष बाब म्हणजे, 2 ते 4 ऑगस्टदरम्यान, आपल्या आवडीच्या प्रोडक्टवर 30 रुपये देऊन प्री-बुक करता येणार आहे. 

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरी प्रोडक्ट्सवर 50 टक्के सूट आणि नो कॉस्ट ईएमआय ऑफर मिळणार आहे. मोबाईल्सवर 30 ते 40 टक्के सूटसह एक्सचेंज ऑफरही मिळणार आहे. टीव्ही आणि इतर होम एप्लायंसेजवर 50 टक्के कमीत-कमी सूट असणार आहे. लॅपटॉपवर 35 ते 40 टक्के सूट देण्यात येत आहे. फॅशन कॅटेगरीमध्ये टॉप ब्रँड्सवर 80 टक्के सूट देण्यात येणार आहे. 

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये बेस्ट सेलर स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. रेडमी नोट 7 प्रो, ऑनर 10 लाईट, सॅमसंग गॅलेक्सी सीरीज, ऍपल आयफोन्स, शाओमी रेडमी 7 सीरीजवर बंपर ऑफर्स देण्यात येणार आहेत. फोनवर एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय आणि बायबॅक गॅरेंटीही देण्यात येणार आहे.