WhatsApp युझर्ससाठी खुशखबर, आता इंटरनेशिवाय चॅटिंगची मज्जा, येतंय नवं अपडेट

जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी  Good News आहे.  WhatsApp चा एक नवीन Updateयेत आहे, 

Updated: Mar 23, 2021, 03:56 PM IST
WhatsApp युझर्ससाठी खुशखबर, आता इंटरनेशिवाय चॅटिंगची मज्जा, येतंय नवं अपडेट  title=

मुंबई : जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी  Good News आहे.  WhatsApp चा एक नवीन Updateयेत आहे, ज्यात Internet विना  WhatsApp वापरण सहज शक्य होणार आहे. जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यासाठी एक मोठी बातमी आहे. 

फेसबूकच्या मालकीचे आयओएस आणि अँड्रॉइड बीटा व्हॉट्सअॅप वेब बीटा प्रोग्रामवर काम  करत असल्याची माहिती पुढे येत आहे. या व्हॉट्सअॅप वेब बीटा प्रोग्रामनुसार स्मार्टफोनला इंटरनेटशी कनेक्ट न करता व्हॉट्स अॅप वेबचा सहज वापर करता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला ट्रॅक करणारी वेबसाइट WABetaInfo डब्ल्यूएबीएटा इन्फोच्या मते, ही सेवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp Business App) बिझिनेस अ‍ॅप या दोन्हीसाठी  उपलब्ध असेल. हाइप केलेल्या मल्टी-डिवाइस सपोर्ट फंक्शनसाठी व्हॉट्सअॅप वेब बीटाची मोठी मदत होणार आहे.

WABetaInfo डब्ल्यूएबीटाइन्फो या वेबसाइटने एक स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे, ज्यात व्हाट्सएप वेबची अनेक वैशिष्ट्ये सांगितली आहे. व्हॉट्सअॅप वेब बीटा प्रोग्राममध्ये डिलीट फॉर एव्हरीव्हन हा ऑप्शन आता प्रत्येकासाठी उपलब्ध असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या अपडेटनुसार इस प्रोग्राममध्ये Enroll असलेल्या दुसऱ्या यूजर्स बरोबर चॅट करण्यासाठी यूजरकडे अ‍ॅपचं लेटेस्ट अपडेट व्हर्जन असणं गरजेचं आहे. या प्रोग्रामचा वापर करण्यासाठी अ‍ॅपच अपडेटेड व्हर्जन असणं आवश्यक आहे. 

जर दुसरा यूजर व्हॉट्सअ‍ॅपचं अपडेटेड व्हर्जन वापरत नसेल तर कॉल आणि मेसेज दोन्ही सपोर्ट करणार नाहीत. सध्या हा फीचर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये उपलब्ध नसला तरी कंपनी यांवर काम करत आहे.