Android Smartphone यूजर्ससाठी मोठी बातमी, लवकरच दिसणार 'हे' मोठे बदल

Google ने अँड्रॉईड स्मार्टफोनबाबत मोठा निर्णय घेतला असून स्मार्टफोन  यूजर्सची या निर्णयामुळे लॉटरी लागणार आहे. नेमकं गुगलने कोणता निर्णय घेतला आहे याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

Updated: Jan 30, 2023, 09:23 AM IST
Android Smartphone यूजर्ससाठी मोठी बातमी, लवकरच दिसणार 'हे' मोठे बदल  title=
Google’s big decision, bat-bat for Android smartphone users

Google Update: जागतिक स्तरावरील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांची आहे. याच गुगलने भारतीयांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून गुगलच्या या निर्णयामुळे अँड्रॉईड स्मार्टफोन (Android Smartphone) युजर्सची चांदी होणार आहे. कारण आतापर्यंत अँड्रॉईड स्मार्टफोन विकत घेतल्यावर त्यामध्ये अनेक गुगल अॅप्स आधीच देण्यात आले होते. जे तुम्हाला हवे असतानाही फोनमधून काढणे शक्य नव्हते. पण आता गुगलने भारतीय स्मार्टफोन उत्पादकांना त्यांच्या आवडीचे Apps Install करण्याची संधी दिली आहे. 

अनेक वर्षांपासून भारतातील अँड्रॉइड (Android) कसे ऑपरेट करायचे हे Google ठरवत आहे. गुगलने ठरवलेले नियम हे केवळ वापरकर्त्यांना नव्हे तर डेव्हलपर्सना देखील स्वीकारावे लागतात. मात्र कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) ने गुगलला 1,338 कोटींचा दंड लावला होता. या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गुगलला दिलासा देण्यास नकार दिला होता.  

वाचा: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर 

दरम्यान सुरूवातीला गुगलची अट होती की जर स्मार्टफोन कंपन्यांनी अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम वापरली तर त्यांना गुगल क्रोम, जीमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल मॅप, गुगल मीट असे गुगलचे ॲप्स वापरावे लागतील. मात्र आता यूजर्स फोनमध्ये त्यांच्या आवडीचे ॲप्स इन्स्टॉल करू शकतील. तसेच कोणते सर्च इंजिन वापरायचे? त्याबाबतही निर्णय होऊ शकणार आहे. 

स्मार्टफोन स्वस्त होणार

जर का Xiaomi कंपनीला परवडणारा स्मार्टफोन लाँच करायचा असेल तर, आता केवळ गुगल सर्च अ‍ॅपसह डिव्हाईस शिप करू शकते. तसे झाले तर या स्मार्टफोनची किंमत अधिक परवडणारी होईल. यामुळे कंपन्यांना 3000 रुपयांच्या खाली अँड्रॉइड स्मार्टफोन लाँच करण्याची परवानगी मिळू शकते. आधी जीएमएसच्या अतिरिक्त किंमतीमुळे पूर्वी शक्य नव्हते. गुगलच्या या निर्णयामुळे भारतातील बाजारपेठ स्वस्त स्मार्टफोनसाठी उपलब्ध असेल.

अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर गुगल प्ले स्टोअर व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून अ‍ॅप इन्स्टॉल करता येतात. मात्र आता वापरकर्ते साईडलोड केलेले अ‍ॅप ऑटोमॅटिक उपडेट सुद्धा करू शकणार आहेत. एवढेच नाही तर थर्ड पार्टी अ‍ॅप स्टोअर्स सध्या प्ले स्टोअरप्रमाणेच अ‍ॅप अपडेट करू शकणार आहेत.