मुंबई : जगात सगळ्या जास्त वापरले जाणारे ब्राउझर म्हणजे गुगल क्रोम. ज्यावर तुम्हाला कधीही, कुठेही आणि कोणतीही माहिती मिळते. त्याचप्रमाणे गुगल आपल्या यूझर्सना सर्वाधीक आणि चांगली सुविधा कशी देऊ शकतो यावर काम करत असतो आणि आपल्या ब्राउझरमध्ये काही ना काही अपडेट्स आणत असतो. आणि हेच कारण आहे ज्यामुळे लोकं देखील गुगल क्रोमचाच जास्तीत जास्त वापर करतात.
गुगलने आताही आपल्या यूझर्सना चांगली आणि फास्ट सुविधा देण्याचे जाहीर केले आहे, क्रोम ब्राउझर आता 23 टक्क्यांपर्यंत वेगाने चालणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे. गुगलच्या फ़ास्ट ब्राउजर डिलीवर एक की कंपोनंट फास्ट जावास्क्रिप्ट एग्जीक्यूशन कार्य करते. हे कार्य क्रोममध्ये व्ही 8 जावास्क्रिप्ट इंजिनद्वारे केले गेले आहे, जो दररोज 78 वर्षांच्या जावास्क्रिप्ट कोडची अंमलबजावणी करतो.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, M91 मध्ये क्रोम आता एक नवीन स्पार्कप्लग कंपायलर आणि शॉर्ट बिलिन कॉल सुरू केल्यामुळे तो 23 टक्के अधिक वेगवान झाला आहे, ज्यामुळे आमच्या यूझर्सच्या सीपीयू टाइमचे 17 वर्षांहून अधीक वेळेची बचत होते.
स्पार्कप्लग हे एक नवीन जावास्क्रिप्ट कंपाईलर आहे, जे पटकन अंमलबजावणी सुरू करण्याची आवश्यकता आणि जास्तीत जास्त कामगिरीसाठी कोड ऑप्टिमाइझ करण्याची आवश्यकता यांच्यातील अंतर भरुन काढते.
गुगलने एका अपडेटमध्ये म्हटले आहे की, व्ही 8 इंजिनमध्ये बरेच कंपाइलर आहेत, जे जावास्क्रिप्ट कार्यान्वित करण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे ट्रेडऑफ बनवू शकतात. गुगलचे व्ही 8 जावास्क्रिप्ट इंजिन 2008 मध्ये लाँच केले गेले होते.
हे डेवलपर्सना जावास्क्रिप्टमध्ये ब्राउझरसाठी बरेच मोठे अॅप्लीकेशन लिहिण्याची अनुमती देते, तसेच Google ब्राउझर आणि ओपन-सोर्स क्रोमियम प्रोजेक्टला इतर ब्राउझरवर अग्रेसर करतो. मायक्रोसॉफ्टने या आठवड्यात त्याच्या क्रोमियम-आधारित ब्राउझरचे 91 व्हेरिएंट जारी केला आहेत. कंपनीने असा दावा केला आहे की,यामुळे स्लीपिंग टॅब मेमरीवर आता 82 टक्क्यांपर्यंत डेटा बचत देखील केली जाऊ शकते.