Google Chrome News in Marathi : सध्याच्या काळात अन्न, वस्त्र निवारापेक्षाही आता सोशल मीडिया ही जास्त मूलभूत गरज झाली आहे. या डिजिटलच्या युगात जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. डिजिटल युगात अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत आणि संपूर्ण जग जवळ आले आहे. मात्र या डिजिटल युगातील काही हलगर्जीपणा ही तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. अलीकडच्या काळात जगभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सायबर गुन्हेगार हे अशा लोकांच्या शोधात असतात ते टेक्नोसॅव्ही नसतात. जे लोक डिजिटल गोष्टींचा वापर करण्यास सक्षम नसतात, अशा Google Chrome वापरकर्त्यांचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार टपून बसलेले असतात. तुम्ही पण जर इंटरनेट वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्हीही तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड गुगल क्रोमवर सेव्ह करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
गुगल क्रोम वापरत असताना, बरेच लोक आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड त्यावर सेव्ह करतात. मात्र, काही आयटी कंपन्यांनी घरबसल्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे की, गुगल क्रोमवर सेव्ह केलेला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड हॅक होऊ शकतो. याशिवाय, तुमचा वैयक्तिक डेटा आणि तुमच्या कंपनीचा डेटा लीक होण्याचा धोका आहे. तुम्हाला जर पासवर्ड आण लॉगिन सेव्ह करायचं नसेल तर जाणून घ्या टिप्स...
- सर्वप्रथम तुमच्या फोन किंवा लॅपटॉपमध्ये क्रोम ब्राउझर उघडा.
- नंतर वरच्या उजव्या कोपर्यात दर्शविलेल्या तीन बिंदूंवर टॅप करा किंवा क्लिक करा.
- पुढे ड्रॉप-डाउन मेनूमधून सेटिंग्ज वर जा.
- येथे तुम्हाला पासवर्ड विभाग दिसेल, त्यावर टॅप करून तुम्ही सेव्ह केलेले पासवर्ड पाहू शकता.
- लक्षात ठेवा की ,तुम्ही तो स्वयंचलितपणे सेव्ह केला असला तरीही तोच पासवर्ड येथे निवडला जाईल. तसेच, जर तुम्ही ऑटो सेव्ह पर्याय सेट केला असेल तर सर्व पासवर्ड सेव्ह होतील.
- पासवर्ड मॅनेजरमध्ये तुम्हाला बंद करण्याचा किंवा तुमचे पासवर्ड ऑटो सेव्ह ऑफ किंवा ऑन करण्याचा पर्याय देखील मिळेल.
- तुम्ही येथे ऑटो साइन-इन देखील बंद करू शकता.
- तुम्हाला Chrome वरून कोणत्याही वेबसाइटचा पासवर्ड डिलीट करण्याचा पर्याय देखील मिळेल.
- कृपया लक्षात घ्या की पासवर्ड पाहण्यापूर्वी, तुम्हाला तुमचा Google खाते पासवर्ड एंटर करावा लागेल किंवा तुमच्या डिव्हाइसचा पासवर्ड देखील विचारात घेतला जाईल. हा पासवर्ड इतर कोणीही ॲक्सेस करू नये म्हणून तयार करण्यात आला आहे.