डाटा चोरी करणारे २९ ब्युटी कॅमेरा ऍप्स गुगलनं हटवले

हे ऍप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सना आपला डाटा चोरी होतोय याची भनकही नव्हती

Updated: Feb 4, 2019, 08:13 PM IST
डाटा चोरी करणारे २९ ब्युटी कॅमेरा ऍप्स गुगलनं हटवले title=

सॅन फ्रान्सिस्को : गूगलनं २९ ब्युटी कॅमेरा ऍप्सला तुमच्या आयुष्यातून काढून टाकलंय. या अॅपमधून पोर्नोग्राफिक कंटेन्ट शेअर केला जात होता. तसंच हा डाटा युजर्सला मुख्यत: भारतात फिशिंग वेबसाईटसद्वारे डाटा चोरण्यासाठी फॉरवर्ड केला जात होता. अमेरिकन सायबर सिक्युरिटी फर्म 'ट्रेन्ड मायक्रो'च्या माहितीनुसार, यातील काही ऍप्स लाखो वेळा डाऊनलोड करण्यात आले होते. आशिया, मुख्यत: हे ऍप सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं होतं. गूगलनं यावर कठोर कारवाई करत हे ऍप आपल्या प्ले स्टोअरमधून डीलिट केलेत. 

'ट्रेन्ड मायक्रो'च्या म्हणण्यानुसार, हे ऍप डाऊनलोड करणाऱ्या युझर्सना आपला डाटा चोरी होतोय याची भनकही नव्हती. युझर्स जेव्हा आपला डिव्हाईस अनलॉक करतील तेव्हा ऍप संपूर्ण स्क्रीनवर वेगवेगळ्या जाहिराती दाखवेल. यातील काही जाहिराती फसवणूक करणारे किंवा पोर्नोग्राफी असू शकतात. जे युझर्सला ब्राऊजरच्या माध्यमातून पॉप-अप करतील. 

रिपोर्टनुसार, विश्लेषणा दरम्यान आम्हाला एक पेड ऑनलाईन पोर्नोग्राफी प्लेअर आढळला. जो पॉप-अपवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड झाला होता. यातील कोणत्याही ऍपकडून जाहिरातींच्या मागे चुकीचा कंटेन्ट असल्याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे, युझर्सना या जाहिराती कुठून आल्या हे शोधून काढणंही अवघड झालं होतं.