लवकरच या फोनवर Google काम करणं होणार बंद, तुमचा फोन तर यामध्ये नाही ना?

यूझर्सना फोनच्या ब्राउझरद्वारे जीमेल, गुगल सर्च, गुगल ड्राइव्ह, यूट्यूब आणि इतर गुगल सेवांमध्ये साइन इन करता येणार नाही.

Updated: Aug 1, 2021, 08:23 PM IST
लवकरच या फोनवर Google काम करणं होणार बंद, तुमचा फोन तर यामध्ये नाही ना? title=

मुंबई : Googleने त्याच्या यूझर्सला धक्कादायक बातमी दिली आहे. कारण आता Google 2.3.7 पेक्षा कमी आवृत्ती असलेल्या Android फोनला साइन-इनला समर्थन देणार नाही. हा बदल 27 सप्टेंबरनंतर Googleमध्ये होणार आहे. त्यामुळे यूझर्सना Google अॅप्स वापरणे सुरू ठेवण्यासाठी किमान Android 3.0 हनीकॉम्बवर अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

हे सिस्टम आणि अ‍ॅप स्तरीय साइन-इनवर परिणाम करेल, यामुळे यूझर्सना फोनच्या ब्राउझरद्वारे जीमेल, गुगल सर्च, गुगल ड्राइव्ह, यूट्यूब आणि इतर गुगल सेवांमध्ये साइन इन करता येणार नाही.

आपल्या अहवालात, 9to5Google ने ज्या यूझर्सवर याचा परिणाम होणार आहे अशो लोकांच्या ईमेलवर याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तसे पाहाता अँड्रॉइडच्या खूप जुन्या आवृत्त्यांचे यूझर्स तसे फार कमी असतील. त्यामु्ळे जास्त लोकांना तसा फारसा याचा परिणाम होत नाही. परंतु Google स्पष्टपणे सांगितले आहे की, हे त्यांनी युझरची सुरक्षा आणि मदतीसाठी हे करण्याचा निर्णय घेतला आहे.

27 सप्टेंबरपासून, Android आवृत्ती 2.3.7 आणि त्यापेक्षा कमी आवृत्ती असणारे युझर्स जेव्हा फोनवर लोड केलेला कोणताही Google अॅप्स साइन इन करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना "username or password error"  असे दिसेल.

27 सप्टेंबरनंतर, अहवालात म्हटले आहे की, जुन्या Android आवृत्त्यांच्या वापरकर्त्यांनी जेव्हा जीमेल, यूट्यूब आणि नकाशे यासारख्या Google उत्पादने आणि सेवांमध्ये साइन इन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्रुटी येईल. जर त्यांनी नवीन Google खाते जोडण्याचा किंवा तयार करण्याचा किंवा फॅक्टरी रीसेट करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा साइन इन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना एक त्रुटी मिळेल.

जुन्या Android आवृत्त्यांच्या वापरकर्त्यांनी जर त्यांचा Google खात्याचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना त्रुटी येतील. कारण Google युझर्सचे सर्व डिव्हाइस साइन आउट करते. ज्यामुळे तुम्हाला Google काहीच करता येणार नाही.

या अँड्रॉइड व्हर्जन वापरकर्त्यांना पर्याय नाही

Android v2.3.7 आणि कमी सॉफ्टवेअर यूझर्ससाठी कोणतेही उपाय काम करणार नाहीत. त्यांना नवीन फोनच विकत घ्यावा लागणार आहे.