मुंबई : होंडा कारने (Honda Cars) एप्रिलमध्ये आलेल्या विविध सणांनिमित्ताने गाडी खरेदीवर जबरदस्त सूट दिली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी कंपनीने कॅश डिस्काउंट (Cash Discount) शिवाय इतर अनेक ऑफर्स दिल्या आहेत. कंपनी या महिना अखेरपर्यंत ग्राहकांच्या सूट देत आहे. (Honda Cars is getting tremendous discounts)
कंपनीने सांगितले की, या महिन्यात 30 तारखेपर्यंत जे ग्राहक नवीन कार खरेदी करणार असतील त्यांच्यासाठी कंपनीच्या सर्व होंडा डिलरशिपमध्ये ही सूट मिळणार आहे. Amaze मॉडेलवर 38,000 रुपये, Wrv वर 32,500 रुपये, Jazzवर 32,000 रुपये आणि 5 वी जनरेशनच्या City वर 10,000 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे.
कंपनीने ग्राहकांसाठी एक्सचेंज ऑफरही लागू केली आहे. याव्यतिरिक्त होंडाच्या सध्याच्या ग्राहकांना लॉयल्टी बोनस किंवा पुरानी होंडा कारवरील विशेष एक्सचेंज ऑफर दिली आहे. प्रथम मारुति सुजुकीने आपल्या 10 मॉडेलच्या ग्राहकांसाठी कॅश डिस्काउंट आणि इतर फायद्याची घोषणा केली आहे.
होंडा (Honda) कार इंडिया लिमिटेडची (HCIL)आता डाव्या हाताने वाहन चालविणे (Left Hand Driving) शक्य होणार आहे. कंपनी Left Hand Driving कार उत्पादन सुरु करणार आहे. नुकत्याच झालेल्या लॉन्चमध्ये 5 व्या जनरेशनच्या नवीन होंडा सिटी एक्सपोर्ट लेफ्ट ड्राड ड्राइव्ह देशांकडे निर्यात करण्यात सुरुवात केली आहे. ही पहिलीच वेळ आहे. भारतात पहिल्यांदा कंपनी Left Hand Driving कार उत्पादन निर्यातीसाठी बनवत आहे.
HCIL च्या या निर्णयामुळे कंपनी भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’च्या आपल्या प्रतिबद्धतेची आणि मजबुतीसाठी प्राधान्य देत आहे. कंपनीच्या गुजरातमधील पीपावाव बंदर आणि चेन्नईमधील एन्नोर बंदरातून मध्य पूर्वेकडील देशात गाड्यांची पहिली बॅच रवाना केली आहे. त्याचबरोबर पाचव्या जनरेशनचे होंडा सिटीची निर्यात शुरु केली आहे.