Honda CB300F Price and Features: मोटारसायकलप्रेमींमध्ये होंडाच्या बाइकबाबत कायमच उत्सुकता असते. होंडाने एखादी बाइक लाँच केली की, त्याचे फीचर्स आणि लूकबाबत कुतुहूल असतं. होंडाने भारतात आपली नवी स्पोर्टी मोटारसायकल CB300F लाँच केली आहे. या बाइकचे डिलक्स आणि डिलक्स प्रो असे व्हेरियंट आहेत. डिलक्स बाइकची किंमत 2,25,900 रुपयांपासून सुरु होते. तर डिलक्स प्रो व्हेरियंट 2,28,900 रुपये (एक्स शोरुम) आहे. ही गाडी तीन रंगात उपलब्ध आहे. यात मॅट एक्सिस ग्रे मॅटेलिक, मॅट मार्वल ब्लू मॅटेलिक आणि स्पोर्ट्स रेड असे रंग आहेत.
यात फुल एलईडी हेडलॅम्प आणि विंकर्स देण्यात आले आहेत. तसेच पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनलवर चालकाला रिअलटाइम/सरासरी मायलेज, फ्यूअल लेव्हल, बॅटरी व्होल्टेज आणि गियर पोजिशन यांसारखी माहिती मिळते. बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोलची सुविधाही उपलब्ध आहे. डिलक्स प्रो व्हेरिएंटवर तुम्हाला होंडाची स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टम देखील मिळते.
स्पेसिफिकेशन
बाइकमध्ये 293 सीसी ऑइल-कूल्ड4-वॉल्व SOHC इंजिन दिलं गेलं आहे. कंपनीचा दावा आहे, लांबच्या प्रवासात जबरदस्त अनुभव देईल. इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशनसह जोडलं गेलं आहे. यात ड्युअल चॅनेल एबीएससह असिस्ट आणि स्लिपर क्लच दिला आहे. यामुळे आरामदायी राइडचा अनुभव मिळेल.