Mahindra Jeeto Plus CNG 400: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने भारतीय बाजारात आपलं नवीन कमर्शियल वाहन लाँच केलं आहे. या गाडीला जीतो प्लस 400 (Jeeto Plus CNG 400) सीएनजी असं नाव दिलं आहे. या गाडीची किंमत फक्त 5.26 लाख (एक्स शोरूम) इतकी आहे. या गाडीमध्ये 2 सीएनजी टाक्या दिल्या आहेत. एक टाकी 40 लिटर आणि दुसरी टाकी 28 लिटरची आहे. दोन्ही टाक्यांची एकूण क्षमता 68 लिटर आहे. कंपनीचा दावा आहे की, ही गाडी पूर्ण टँक भरल्यानंतर 400 किमी पेक्षा जास्त किमीचा मायलेज देईल, म्हणूनच या गाडीला सीएनजी 400 असे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच 35.1 किमी प्रति किलो मायलेज देईल. तसेच त्याची पेलोड क्षमता 650 किलो आहे. कंपनीचा दावा आहे की, इतर पिकअपपेक्षा 30 टक्के जास्त बचत मिळेल.
महिंद्रा जीतो प्लस सीएनजीमध्ये एक पॉवरफुल इंजिन दिलं गेलं आहे. हे इंजिन 1600-2200 आरपीएमवर 15 किलोवॅट पीक पॉवर आणि 44 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही गाडी 3 वर्षे/72000 किमीच्या वॉरंटीसह सादर केली आहे. या गाडीचा मेन्टेनन्स0.22 रुपये प्रति किमी आहे. नवीन जीतो प्लस सीएनजी चारसौमध्ये कारसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. उत्तम हेडरूम आणि लेगरूमसह मोठी केबिन आणि विशेषत: लांब पल्ल्याचा प्रवास आनंददायी बनवण्यासाठी आरामदायी आसनं दिली आहेत.
टाटा मोटर्सनंतर महिंद्राच्या कमर्शियल गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. या सेगमेंटमध्ये महिंद्राच्या गाड्यांना पसंती दिली जाते. जुलै 2022 महिन्यात कंपनीने 16,478 युनिट्सची विक्री केली.