होंडाने लॉन्च केली विंटेज स्टाईल नवीन स्कूटर...

जपानी कंपनी होंडाने अलीकडेच थायलॅंडमध्ये विंटेज स्टाईल स्कूटर सुपर कब लॉन्च केली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 20, 2018, 03:36 PM IST
होंडाने लॉन्च केली विंटेज स्टाईल नवीन स्कूटर... title=

नवी दिल्ली : जपानी कंपनी होंडाने अलीकडेच थायलॅंडमध्ये विंटेज स्टाईल स्कूटर सुपर कब लॉन्च केली. ही होंडाची अत्यंत सक्सेसफूल स्कूटर आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये याची जगभरात १० कोटींहुन अधिक युनिट्स विक्रीला गेली. 
होंडाने ही स्कूटर १९५८ मधील त्यांच्या एका मॉडलपासून प्रेरित होऊन बनवली आहे. १९५८ मध्ये ही स्कूटर पहिल्यांदा बनवली गेली होती. तेव्हाही हे मॉडल अत्यंत लोकप्रिय झाले होते.

काय आहे खासियत?

भारतीय बाजारातील प्रचलित स्कूटरपेक्षा ही स्कूटर एकदम वेगळी आहे. त्यामुळे ही स्कूटर नवीन पीढीच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे. सुपर कबमध्ये कंपनीने 109 CC चे एअर कूल इंजिन दिले आहे. ही 500 rpm वर 89 bhp पॉवर आणि 5,500 rpm वर  Nm पीक टॉर्क जेनरेट करतात. 

दोन्ही पायांजवळ ब्रेक

स्कूटरला पुढे आणि मागे दोन ड्रम ब्रेक्स दिले आहेत. भारतात आतापर्यंत ही स्कूटर लॉन्च करण्यात आली नाहीये. इंस्पायर्ड होंडा सीडी100 ही बाईक भारतात लॉन्च करण्यात आली होती. 

honda, honda super cub, super cub, super cub in thailand, सुपर कब

१० कोटींहुन अधिक युनिटचे उत्पादन

गेल्या वर्षी होंडाने घोषणा केली होती की, सुपर कॅबचे १० कोटींहुन अधिक यूनिटचे उत्पादन करण्यात आले आहे. २००५ मध्ये जगभरात याचे ५ कोटींहुन अधिक युनिट विकले गेले आहेत. १२ वर्षात याची विक्री दुप्पट झाली आहे. 'You meet the nicest people on a Honda' ही या स्कूटरची टॅगलाईन आहे.