नवी दिल्ली : भारतात लवकरच होंडाची एक स्पोर्टी लूक असलेली नवीन बाईक लॉन्च होणार आहे. '150 SS रेसर' असं या बाईकचं नाव आहे.
वेगाची क्रेझ असलेल्या तरुणांमध्ये १५० सीसीची ही बाईक चांगलीच लोकप्रिय ठरू शकते. उल्लेखनीय म्हणजे, होंडानं १५० सीसी बाईक सेगमेंटमधल्या आपल्या 'सीबीआर १५० आर'चं प्रोडक्शन भारतात आधीच बंद केलंय.
या बाईकमध्ये एलईडी टेललॅम्प लाईट, क्लयर लेन्स टर्न इंडिकेटर्स, लाईट रिफ्लेक्टर आणि रिअर डिस्क ब्रेक असलेल्या या बाईकचा लूक एकदम हटके दिसतोय.
'150 SS रेसर' ही बाईक पहिल्यांदा २०१७ च्या बँकॉक इंटरनॅशनल मोटर शोमध्ये दिसली होती. परंतु, या बाईकची किंमत काय असेल? याबाबतीत अद्याप तरी खुलासा झालेला नाही.