मुंबई : मोबाईलवर गूगलच्या माध्यमातून इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्ज केल्यावर अनेकांना हिस्ट्री डिलीट करायची असते. तसेच, डिलीट केलेली हिस्ट्री पुन्हा दिसू नये असेही अनेकांना वाटत असते. पण, त्यासाठीचा सोपा आणि सुरक्षित मार्ग त्यांना माहिती नसतो. म्हणूनच जाणून घ्या अॅण्ड्रॉईड मोबाईलवर सर्च हिस्ट्री कशी डिलीट करावी.
गुगलने आपले The Google सर्च अॅप्लिसेशन आता अपडेट केले आहे. ज्यामध्ये गूगलने सर्च हिस्ट्रीमध्ये स्क्रिनशॉस्टची एक लिस्ट बनवली आहे. ही लिस्ट सर्च अॅपमध्ये सर्वात खाली डाव्या कोपऱ्यात दिलेल्या क्लॉक आयकॉनवर क्लिक करून एक्सेस करता येऊ शकते.
हे अॅप तुम्ही दिवसभरात सर्च केलेल्या सर्व गोष्टींना ट्रॅक करू शकते. तसेच, तुम्हाला जर विशिष्ट दिवशी तुम्ही काय सर्च केले हे शोधायचे असेल तरीसुद्धा तुम्ही डाव्या बाजूला स्वाईप करू शकता. अर्थात काही लोकांना हे अॅप अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते. तर, काहींना हा त्यांच्या खासगी जीवनावर मर्यादा घालणारा प्रकार वाटू शकतो.
जे यूजर्स या स्क्रिनशॉस्ट्सना सेव करू इच्छितात ते वरील प्रद्धत फॉलो करू शकतात. तसेच, फीचरला डीसेबलही करू शकतात. याशिवाय स्टोअर केलेले स्क्रिनशॉटही डिलीट करता येऊ शकतात.
स्क्रिनशॉट डिलिट करण्यासाठी यूजरला गूगल अॅप उघडावे लागले. त्यानंतर मुख्य स्क्रीनवर दिलेल्या हिस्ट्री आयकॉनवर टॅप करावे लागले. यानंतर आपल्या मोबाईल स्क्रिनवर आपली गेल्या दिवसांतील सर्व हिस्ट्री दिसू लागेल. यूजर प्रत्येक सर्चवर स्वाईप करू शकतात. तसेच, त्यानंतर स्क्रिनशॉट डिलीटही करू शकतात.
स्क्रिनशॉट डिलीट करण्याशिवाय यूजर हे फिचर डिसेबलही करू शकतात. त्यासाठी मुख्य स्क्रिनवर जा. सर्वात वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात दिलेल्या तीन हॉरिझाँटल लाईन्सवर क्लिक करा. आता तुम्हाल एक मेनू दिसेल. आता पुन्हा सेटींगमध्ये जा Accounts & Privacy वर टॅप करा. यानंतर आणखी एक दूसरी स्क्रिन उघडेल. इथे तुम्हाला अनेबल रीसेंट ऑप्शनला टर्न ऑफ करावे लागेल. यानंतर आपल्या गुगल सर्चचे स्क्रिनशॉट स्टोअर होणा नाहीत.