तुमच्या कार किंवा बाइकला VIP नंबर हवा आहे का? मग असं कराल रजिस्ट्रेशन

रस्त्यावर धावणारी काही वाहनं आपल्या आकर्षक नंबर प्लेटमुळे लक्ष वेधून घेतात. गाड्यांचे नंबर आपले वेगळंपण दर्शवतात. 

Updated: Sep 1, 2022, 05:38 PM IST
तुमच्या कार किंवा बाइकला VIP नंबर हवा आहे का? मग असं कराल रजिस्ट्रेशन title=

VIP Number For Car/Bike: रस्त्यावर धावणारी काही वाहनं आपल्या आकर्षक नंबर प्लेटमुळे लक्ष वेधून घेतात. गाड्यांचे नंबर आपले वेगळंपण दर्शवतात. हे व्हीआयपी नंबर पाहिल्यानंतर आपल्या गाडीला असाच काहीतरी युनिक क्रमांक असावा असं वाटतं. पण तुमची व्हीआयपी नंबर घ्यायची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला व्हिआयपी नंबर कसा घ्यायचा? याबाबत सांगणार आहोत. व्हीआयपी नंबर घेण्यासाठी सरकारला अतिरिक्त शुल्क भरावं लागतं. यानंतर आपल्याला आपल्या आवडीचा नंबर मिळतो. चला तर मग जाणून घेऊयात, नेमकी प्रक्रिया असते. 

व्हीआयपी नंबर प्लेटसाठी आपण घरबसल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो. यासाठी सर्वात प्रथम अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाइटवर लॉगिन करावं लागेल. पब्लिक यूजर म्हणून स्वतःची नोंदणी करावी लागेल. यानंतर, तुम्हाला निश्चित शुल्क भरून तुमच्या पसंतीचा क्रमांक आरक्षित करावा लागेल. व्हीआयपी नंबर प्लेट्सच्या अनेक श्रेणी आहेत, ज्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते.

अर्ज कसा करायचा?

परिवहन मंत्रालयाच्या वेबसाइटवर पब्लिक यूजर म्हणून नोंदणी केल्यानंतर, नंबर प्लेटपैकी एक निवडा. त्यानंतर फी भरा. तुम्ही पैसे दिल्यानंतर तुम्हाला नंबरसाठी लिलावात भाग घ्यावा लागेल. तुम्ही लिलाव जिंकल्यास तुम्हाला तुम्ही निवडलेला नंबर मिळेल.

फॅन्सी नंबर म्हणजे काय?

परिवहन प्राधिकरण 0001 ते 9999 दरम्यान अनेक क्रमांकांना व्हीआयपी ओळख देते. हे नंबर Super Elite, Single Digit आणि Semi Fancy Numbersसारख्या श्रेणींमध्ये विभागले आहेत.  या फॅन्सी नंबर प्लेटची मूळ किंमत आणि लिलावानंतरची किंमत वेगळी असते. उदाहरणार्थ, सुपर एलिट नंबर (0001) 5 लाख रुपयांना बुक केला जाऊ शकतो. मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही किंमत वेगळी असू शकते.