close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Hyundai Santro ला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, तोडले सर्व रेकॉर्ड

पाहा फिचर्स 

Hyundai Santro ला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, तोडले सर्व रेकॉर्ड

मुंबई : हल्लीच लाँच झालेली ह्युंडाईची नवीन सेंट्रोला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कारची बुकिंग सुरू झाली असून आतापर्यंत 22 दिवस झाले आहेत. आणि अवघ्या 22 दिवसात या कारने 28,800 बुकिंग केल्या आहेत. यामुळे ह्युंडाईने यावर्षातील ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त विक्रीचा आकडा गाठला आहे. ऑक्टोबरमध्ये ह्युंडाईने 52,001 युनिट्स कार विकल्या आहेत. हा आकडा 2017 ऑक्टोबर विक्री ते 4.9 टक्के जास्त झालं आहे. 

ह्युंडाई सेंट्रोला अगदी सुरूवातीपासून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कारला अवघ्या 9 दिवसांत 14 हजार लोकांनी बुक केलं आहे. तर अधिकृत लाँचिंगपर्यंत 23,500 लोकांनी बुक केलं आहे. ह्युंडाईने माहितीनुसार सेंट्रोला 1,29,500 चौकशी केली आहे. 

कंपनीने हे देखील सांगितलं की, त्यांचा प्लान प्रत्येक महिन्यात 10 हजार यूनिट्स प्रोड्यूस करत आहेत. सेंट्रो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक ते दोन महिने वाट पाहावी लागणार आहेत. नवीन सेंट्रो 5 ट्रिम आणि 9 वेरिएंटमध्ये लाँच केला आहे. या कारची सुरूवातीची किंमत 3.89 लाख रुपये आहे.