मुंबई: आपल्या मोबाईलमध्ये अनेक फोटो व्हिडीओ असतात. मात्र त्यामध्ये काही खासगी फोटो किंवा क्षण जपून ठेवलेले असतात. जे कुणालाही दिसून नयेत असं वाटत असतं. बऱ्याचदा आपण मोबाईल दुसऱ्याच्या हातात देत असताना या गोष्टींची भीती बाळतो. कोणासमोर खासगी फोटो किंवा व्हिडीओ पटकन ओपन होऊ नयेत यासाठी आणि आपल्या मोबाईलमध्ये ते कसे लपवून ठेवायचे त्यासाठी आज खास ट्रिक सांगणार आहोत.
अँन्ड्रॉइड आणि आयएसओसाठी खास वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. Apple युझर्ससाठी मोबाईलमध्येच एक खास फीचर आहे. त्याचा वापर करून युझर्स फोटो किंवा व्हिडीओ हाइड करू शकतात. यासाठी आपल्याला या सोप्या टिप्स वापराव्या लागणार आहेत.
iPhone किंवा iPad वर फोटो अॅप उघडलं की तुम्हाला जो अल्बम हाइड करायचा त्यावर टॅप करा
. वरच्या बाजूला उजवीकडे निवडलेल्या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला हाइड करायचे फोटो निवडा आणि पर्याय निवडून व्हिडीओ निवडा.
त्यानंतर तुमचे फोटो हाईड होतील.
Android यूजर्ससाठी हाइड अॅप किंवा हिडन फोल्डर तयार करा
- स्मार्टफोनमध्ये गुगल फोटोमध्ये फोटो अॅप ओपन करा
- जे फोटो हाईड करायचे ते फोटो सिलेक्ट करा
- उजव्या कोपऱ्यात तीन ठिपके आहेत त्यावर क्लिक करा
-Move to Archive ऑप्शनवर क्लिक करा
-फोटो आणि व्हिडीओ आर्काइव नावाच्या फोल्डरला जातील