एका ब्राऊजरवर एकाहून अधिक जीमेल अकाऊंट्स कसे ओपन कराल ?

आजकाल कोणाचे जीमेल अकाऊंट नसेल तर नवलच. एकच काय तर एकाहून अधिक अकाऊंट प्रत्येकाचे असतात. मात्र ते एका ब्राऊजर ओपन करणे कठीण होते. म्हणजे कॉम्प्युटरवर एका टॅबमध्ये एक अकाऊंट ओपन केल्यावर दुसऱ्या टॅबमध्ये दूसरे जीमेल अकाऊंट ओपन करणे शक्य होत नाही.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 13, 2017, 12:38 PM IST
एका ब्राऊजरवर एकाहून अधिक जीमेल अकाऊंट्स कसे ओपन कराल ? title=
नवी दिल्ली : आजकाल कोणाचे जीमेल अकाऊंट नसेल तर नवलच. एकच काय तर एकाहून अधिक अकाऊंट प्रत्येकाचे असतात. मात्र ते एका ब्राऊजर ओपन करणे कठीण होते. म्हणजे कॉम्प्युटरवर एका टॅबमध्ये एक अकाऊंट ओपन केल्यावर दुसऱ्या टॅबमध्ये दूसरे जीमेल अकाऊंट ओपन करणे शक्य होत नाही.
 
मात्र काळजी करू नका. या समस्येवर उपाय आहे. ब्राऊजर कोणतेही असो तुम्ही अगदी सहज एकापेक्षा अधिक जीमेल अकाऊंट ओपन करू शकता. पाहूया कसे ते.
 
क्रोम ब्राऊजर
 
  • सर्वातआधी गूगल क्रोम मेन्यू बारमध्ये ओपन करा.
  • त्यानंतर वर असलेल्या सर्चबारवर उजव्या बाजूला असलेल्या तीन रेषांवर क्लिक करा.
  • आता  New Incognito window वर जा. ही विंडो ओपन करण्यासाठी तुम्ही Ctrl+Shift+N चा देखील वापर करू शकता. 
  • त्यानंतर विंडोवर पर्सनल ब्राऊजर विंडो ओपन होईल.
  • या टॅबमध्ये तुम्ही तुमच्या Gmail id ने लॉग इन करू शकता.

इंटरनेट एक्सप्लोरर

  • इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर ओपन करा. त्यात सेटींगमध्ये जा.
  • त्यानंतर यात दिसणाऱ्या सेफ्टी ऑप्शनवर क्लिक करा. 
  • यात इनप्राइवेट ब्राऊजिंगचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. यात तुम्ही तुमचे दुसरे जीमेल अकाऊंट ओपन करू शकता.