असं करा जिओच्या 4G स्मार्टफोनचं बुकिंग

रिलायन्स जिओनं आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन बाजारामध्ये आणला आहे.

Updated: Jul 23, 2017, 06:44 PM IST
असं करा जिओच्या 4G स्मार्टफोनचं बुकिंग  title=

मुंबई : रिलायन्स जिओनं आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन बाजारामध्ये आणला आहे. या स्मार्टफोनच्या प्री बूकिंगला सुरुवात झाली आहे. 
अवघ्या पंधराशे रुपयात हा स्मार्ट फोन ग्राहकांना मिळणार असून हे पंधराशे रुपये तीन वर्षानंतर ग्राहकाला परत देण्यात येतील.  त्याशिवाय रिलायन्स जिओच्या फोनवर अनलिमिटेड डेटा मोफत देण्यात येणार आहे.

येत्या १५ ऑगस्टपासून या बम्पर ऑफरची सुरूवात होणार आहे. सप्टेंबरपर्यंत देशात जिओचे १० हजार सेंटर असतील. जिओ येत्या वर्षभरात भारताच्या ९९ टक्के जनतेपर्यंत पोहचलेली असेल, असा दावा मुकेश अंबानींनी केला आहे.

जिओ 4G स्मार्टफोनचं बुकिंग कसं कराल?

रिलायन्स जिओच्या या स्मार्टफोनचं बुकिंग करण्यासाठी तुम्हाला http://www.jio.com/ या वेबसाईटवर जावं लागणार आहे. या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला जिओ फोनचा बॅनर दिसेल. 

यानंतर बॅनरवर असलेल्या कीप मी पोस्टेड ऑपश्नवर क्लिक करावं लागेल. कीप मी पोस्टेड वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं नाव, आडनाव, ई-मेल आयडी आणि फोन नंबर द्यावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला जिओकडून पुढच्या प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात येणार आहे. 

काय आहेत जिओ 4G स्मार्टफोनची फिचर्स 

- टचस्क्रीन शिवाय असणाऱ्या या फोनमध्ये अल्ट्रा-अपोर्डेबल फोरजी वोल्ट असेल

- जिओच्या नेटवर्कवरच हा फोन उपलब्ध असेल

- यात इंटरनेट टिथरिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि जिओ कंटेंट सारखे व्हिडिओ पाहण्यासची सुविधा असेल.

- या हँडसेटवर सबसिडीही दिली जाईल आणि कस्टम ओएस आणि अॅप मार्केटप्लेसची सुविधाही मिळेल

- भारतीय भाषांच्या वापरासाठी यात डिजिटल व्हॉईस फिचरही असेल

- २.४ इंचाचा कलर डिसप्ले असेल

- ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोअरेज असेल... मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्यानं १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल

- या फिचर फोनमध्ये ड्युएल नॅनो सिमचा स्लॉट असेल

- २ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा

- यात २००० mAH बॅटरीसोबत एफएम रेडिओ आणि ब्लूटूथ ४.१ सारखे फिचर असतील