मुंबई : तुमचा फोन चोरी झाल्यानंतर तो काहीतरी चमत्कार होवून परत मिळावा असं सर्वांना वाटतं. फोन कुणाचाही चोरी झाला तर त्याला धक्काच बसतो, कशातही मन लागत नाही. तेव्हा तुमचा फोन चोरी होवू नये, आणि झाला तर तो परत मिळावा, यासाठी काही सेटिंग्ज तुमच्या फोनमध्ये करून घ्याव्या लागतील. त्या आधी खालील एक सत्य घटना समजून घ्या, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की चोरी गेलेला फोन हा परत मिळतो.
आपल्या स्मार्ट फोनमध्ये एक स्मार्ट फीचरचा वापर करून मुंबईच्या २० वर्षीय मुलीला तिचा फोन परत मिळाला आहे. जिनत हक असं या मुलीचं नाव आहे. तिने तिच्या स्मार्टफोनवर माय अॅक्टीव्ह हे फीचर लावलं होतं. जिनतने फक्त आपला फोनच परत मिळवला नाही, तर चोराला पकडण्यातही ती यशस्वी झाली.
जिनतचा फोन रविवार ५ ऑगस्ट २०१८ रोजी रेल्वे प्रवासात चोरी झाला. तिच्याकडे जिओमी रेड्मी एमआय 4 हा फोन होता. तिने फोन शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळाला नाही.
घरी गेली तेव्हा तिला लक्षात आलं की, आपल्या फोनमध्ये माय अॅकिव्ह फीचर ऑन आहे. दुसऱ्याच्या फोनवरून आपण आपला फोन ट्रॅक करू शकतो. माय अॅक्टीव्ह फीचर सर्व गूगलच्या अकाऊंटसाठी असतं. हा तुमच्या मोबाईल डिव्हाईसची अॅक्टीव्हिटी ट्रॅक करत असतो, ज्यात हे अकाऊंट लॉगइन आहे.
या फीचरच्या मदतीने सोमवारी जिनत यांना ईमेलवर त्यांचा फोन चोरी झाल्यानंतरची सर्व माहिती मिळत गेली, चोरी करणाऱ्याच्या घडामोडी समजत गेल्या. जिनत एक प्राथमिक शिक्षक आहे. आपलं काम संपल्यावर जेव्हा जिनतने आपला मोबाईल चेक केला, तेव्हा तिला समजलं की या व्यक्तीने दादर रेल्वे स्टेशनवर, एक तिकीट बूक केलं आहे. यानंतर ती त्वरीत दादर रेल्वे स्टेशनला पोहोचली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशीच जिनत ०८.३० वाजता दादर स्टेशनवर रेल्वे पोलिसांकडे गेली, आरपीएफ नितिन मिस्त्री यांना संपूर्ण घटना सांगितली. या माहितीच्या आधारावर चोराला, पु़डुचेरी एक्स्प्रेसमधून पकडण्यात आलं.
चोराचं नाव सेल्वराज शेट्टी असं होतं. शेट्टी हा ३२ वर्षांचा आहे, तो मालाड पश्मिला राहतो. सुरूवातीला त्याने सर्व आरोप नाकारले, नंतर त्याच्याकडून फोन हस्तगत करण्यात आला.
आरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितलं, आम्हाला आनंद आहे, जिनतने प्रसंगावधान राखून, चोराला पकडण्यात मदत केली आणि आरोपीविरोधात एफआय़आरदेखील दाखल केली. अनेक वेळा असं होतं, आम्ही चोराला पकडतो, त्यानंतर फोन मिळाल्यावर, चोरावर एफआयआर दाखल करण्यात लोक मागेपुढे करतात.
जर तुमच्याकडे गूगल अकाऊंट असेल, तर तुमच्याकडील सर्व डिव्हाईसची अॅक्टिव्हिटी ‘माय एक्टिविटी’ फीचरवर तुम्ही ट्रॅक करू शकतात.तुम्ही myactivity.google.com वर ही माहिती पाहू शकतात.