HTC चा नवा जबदस्त स्मार्टफोन यू-११ आइज

  बाजारात आणखी एक नवा स्मार्टफोन दाखल झालाय. HTCचा यू-११ आइज हा स्मार्टफोन आहे. जरा हटके फोन आहे. ६४ जीबीच्या या फोनचा कॅमेरा १२ मेगाफिक्सल आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 20, 2018, 10:59 PM IST
HTC चा नवा जबदस्त स्मार्टफोन यू-११ आइज title=
छाया सौजन्य : htc.com

मुंबई :  बाजारात आणखी एक नवा स्मार्टफोन दाखल झालाय. HTCचा यू-११ आइज हा स्मार्टफोन आहे. जरा हटके फोन आहे. ६४ जीबीच्या या फोनचा कॅमेरा १२ मेगाफिक्सल आहे.

एचटीसी कंपनीने भारतात हा ‘एचटीसी यू 11 आइज’ लवकर लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फोन डयुअल सेल्फी कॅमेऱ्यासह उपलब्ध असणार आहे. ‘एचटीसी यू 11 आइज’ हा फोन पहिल्यांदा चीनमध्ये उपलब्ध करण्यात आला. भारतात लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे.

या स्मार्टफोनचे फिचर

- एचटीसी यू 11 आइजचा डिस्प्ले ६ इंच पूर्ण एचडीप्लस (1080×2160पिक्सेल), 

- ४ जीबी रॅम सह ६४ जीबी इंटरनल स्टोरेज  

- ५ मेगापिक्सलचा फ्रंट आणि १२ मेगापिक्सलचा बँक कॅमेरा 

- बॅटरी क्षमता ३९३० एमएएच एवढी  

- या फोनची किंमत ३२, ५०० रूपये असून जानेवारी महिना अखेर htc.com वर उपलब्ध होईल.