close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

या दिवाळीत शाओमी देतंय बंपर डिस्काऊंट

 या सर्व ऑफर केवळ स्मार्टफोन खरेदीवर मिळणार

Updated: Nov 2, 2018, 04:11 PM IST
या दिवाळीत शाओमी देतंय बंपर डिस्काऊंट

मुंबई : दिवाळीमध्ये स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. एमआय (MI)कंपनी आपल्या युजर्ससाठी 'दिवाली विथ एमआय' ऑाफर घेऊन आलीयं. 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. यामध्ये ग्राहकांना पेटीएम आणि, मोबिक्विकच्या वापरावर कॅशबॅकही मिळतोयं. याशिवाय ग्राहकांना ixigo चे कूपनही मिळणार आहे. या सर्व ऑफर केवळ स्मार्टफोन खरेदीवर मिळणार आहेत.

शाओमी आपल्या दिवाळी सेलमध्ये शाओमी रेडमी नोट 5 प्रो, रेडमी वाय 2, एमआय ए 2, पोको एफ 1, एमआय बॅंण्ड, एमआय ईयरफोन इ. डिस्काऊंट मिळतंय. याशिवाय कंपनीतर्फे नव्या येणाऱ्या प्रोडक्टवर डिस्काऊंट मिळतंय.

या प्रोडक्टवर डिस्काऊंट 

रेड मी नोट 5 प्रो स्मार्टफोनवर कंपनी 2 हजार रुपयांचा डिस्काऊंट देतेयं. रेडमी वाय 2 स्मार्टफोनवर कंपनी 2 हजार रुपयांचे  डिस्कांऊट मिळतंय. हा स्मार्टफोन आता 9 हजार 499 रुपयांत मिळतोय. 

एमआय ए2 स्मार्टफोनवर शाओमी 2 हजार रुपयांचे डिस्काऊंट देतंय. त्यामुळे हा स्मार्टफोन 14 हजार 499 रुपयांना मिळतोय. 

शाओमी पोको एफ 1 स्मार्टफोन 3 हजार रुपयांच्या डिस्काऊंटवर मिळतोय. या डिस्काऊंटमुळे स्मार्टफोनची किंमत 20 हजार 999 रुपये झाली आहे. या सर्व ऑफर शाओमी पोको एफ1, शाओमी रेडमी नोट 5 प्रो आणि मी ए2 च्या रेड एडीशनवर मिळत आहेत. म्हणजेच रेड एडीशन घेण्यासाठी तुम्हाला जास्त रक्कम मोजावी लागणार नाही. 

याव्यतिरिक्त एमआय राऊटरवर 100 रुपयांचे डिस्काऊंट मिळतंय. याशिवाय ब्लूटूथ स्पीकर, एमआय ब्लूटूथ हेडसेटवर देखील डिस्काऊंट मिळतंय. दिवाळी सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर देखील हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.