इंडियन मोटरसायकलने लॉन्च केली Scout Bobber, पाहा किंमत आणि फिचर्स

बाईक लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन मोटरसायकलने आपली एक जबरदस्त बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 25, 2017, 10:28 PM IST
इंडियन मोटरसायकलने लॉन्च केली Scout Bobber, पाहा किंमत आणि फिचर्स  title=

नवी दिल्ली : बाईक लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन मोटरसायकलने आपली एक जबरदस्त बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

वेगाची आवड असणाऱ्यांसाठी अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी 'इंडियन मोटरसायकल'ने आपली Scout Bobber (स्काऊट बॉबर) मॉडल शुक्रवारी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली.

पाच रंगांत उपलब्ध

Scout Bobber ही बाईक थंडर ब्लॅक, स्टार सिल्व्हर स्मोक, ब्रॉन्ज स्मोक, रेड आणि ब्लॅक स्मोक या रंगांत उपलब्ध असणार आहे.

बाईकची बुकींग किंमत

इंडियन मोटरसायकलने या वर्षी जुलै महिन्यात या बाईकची एक झलक दाखवली होती. आता भारतामध्ये या बाईकची अॅडव्हान्स बुकींग सुरु करण्यात आली आहे. ही बाईक बुक करण्यासाठी ५०,००० रुपये जमा करावे लागणार आहेत.

बाईकचे फिचर्स

या बाईकमध्ये एका लहान कारप्रमाणे इंजिन लावण्यात आलं आहे. स्काऊट बॉबर बाईकमध्ये ११३३ cc चं ट्विन इंजिन बसविण्यात आलं आहे. हे इंजिन १०० बीएचपीची पॉवर आणि ९७.७ न्यूटन मीटरचं टार्क जनरेट करतं. तसेच ६ स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे.

बाईकची किंमत

इंडियन मोटरसायकलने भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलेल्या Scout Bobber बाईकची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत १२.९९ लाख रुपये आहे.

या बाईकची स्पर्धा इतरांसोबत

२०१८ Indian Scout Bobber बाईक ही भारतात लॉन्च होणारी दुसरी स्काऊट बॉबर बाईक आहे. पहिल्या बाईकचं नाव ट्रायम्फ बॉबर असं होतं. स्काऊट बॉबर या बाईकचा मुकाबला ट्रायम्फ बॉबर आणि हार्ली डेव्हिडसन फोर्टी एटसोबत होणार आहे