व्हॉट्सऍपला मिळणार स्वदेशी ऍपचा पर्याय, जाणून घ्या !

 लवकरच हे App सर्वसामान्यांसाठी उपलब्ध

Updated: Feb 9, 2021, 08:40 AM IST
व्हॉट्सऍपला मिळणार स्वदेशी ऍपचा पर्याय, जाणून घ्या ! title=

मुंबई : व्हॉट्सअपला देशी पर्याय निर्माण झालाय. संदेस असं या अॅपचं नाव आहे. काही सरकारी अधिकाऱ्यांनी त्याचा वापरही सुरू केलाय. गव्हर्नमेंट इन्स्टंट मेसेजिंग सिस्टिम एक सोपं अ‍ॅप आहे. गेल्या वर्षी सरकारने याची घोषणा केली होती. तेव्हा याचं नावं GIMS असेल असं म्हटलं जात होतं. मात्र याचं नाव देशी Sandes ठेवलं आहे. 

सध्या व्हॉटसअ‍ॅपचं हे देशी व्हर्जन फक्त सरकारी अधिकाऱ्यांसाठीच आहे. हे सर्वसामान्यांसाठी कधी रोलआउट केलं जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच हे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल असं म्हटलं जात आहे. 

Sandes अ‍ॅप iOS  आणि अँड्रॉइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करते. हे अ‍ॅप व्हॉइस आणि डेटाला सपोर्ट करते. एक मॉडर्न डे चॅटिंग अ‍ॅप आहे. 

या अ‍ॅपचं बॅकएंड नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर हँडल करते. हे आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत आहे.