स्मार्टफोन खरेदी करताय ! फक्त 749 रुपयांना मिळवा 13 हजारांचा फोन

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.

Updated: May 28, 2022, 02:13 PM IST
स्मार्टफोन खरेदी करताय ! फक्त  749 रुपयांना मिळवा 13 हजारांचा फोन  title=

मुंबई : नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. फ्लिपकार्टवर सध्या सेल सुरु आहे. या सेलवर एक नवीन 4G स्मार्टफोन फक्त 749 रूपयांना मिळत आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.  

Infinix Note 12 हा 4G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 28 मे पासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. Infinix Note 12 ची लाँच किंमत 12 हजार 999 रुपये आहे. या स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या ऑफर्समुळे तुम्हाला हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.  या फोन खरेदीसाठी 
Axis Bank चे कार्ड वापरल्यास, तुम्हाला 1 हजार रुपयांची सूट मिळेल आणि तुम्ही Flipkart Axis क्रेडिट कार्ड वापरल्यास तुम्हाला 600 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

749 रुपयांना कसा खरेदी करू शकाल ? 

Infinix Note 12 ची मुळ किंमत 13 हजार रूपये आहे. या स्मार्टफोनवर 12 हजार रूपयांपेक्षा जास्त सूट कशी मिळतेय ते जाणून घेऊयात. विशेष म्हणजे या स्मार्टफोनवर Exchange offer देण्यात आली आहे. म्हणजे जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात 12,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन खरेदी करून तुम्ही 12,250 रुपयांपर्यंत बचत करू शकता. जर तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा झाला तर तुम्ही हा फोन फक्त 749 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल.

फिचर्स 
Infinix Note 12 हा 4G स्मार्टफोन आहे.
7.6-इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले 
1000nits ची शिखर ब्राइटनेस 
5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. 
MediaTek Helio G88 प्रोसेसर 
6GB रॅमसह 5GB व्हर्चुअल रॅम आणि SD कार्डच्या मदतीने 128GB स्टोरेज 
16MP फ्रंट कॅमेरा, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 50MP सेन्सर, 2MP डेप्थ लेन्स आणि AI लेन्स