Instagram Down : आज दिवसभरात अनेकांना इन्टाग्राम अकाऊंटमध्ये (Instagram Account) काहीतरी गडबड जाणवत आहे. अनेकांना लॉगिन समस्यांना (Instagram login) तोंड द्यावं लागतंय. आज दुपारपासून इन्स्टाग्रामचे युझर्स वैतागले आहेत. त्यामुळे आता इन्स्टाग्राम अकाऊंट बंद होण्यामागचे कारण काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
इन्टाग्राम वापरताना अडचणी येत असल्याने नेटकऱ्यांनी कंपनीला ट्विटरवरून धारेवर धरलं. ट्विटरवर instagramdown आणि My Instagram असे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत. त्यामुळे नक्की काय झालंय?, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. अशातच आता इन्टाग्रामने ट्विट करत प्रकरणावर खुलासा केलाय.
आम्हाला माहिती आहे की तुमच्यापैकी काहींना तुमच्या Instagram खात्यात प्रवेश करण्यात समस्या येत आहेत. आम्ही तपास करत आहोत, असं इन्टाग्रामने स्पष्ट केलंय. तर गैरसोयीबद्दल दिलगीर देखील त्यांनी ट्विट करत व्यक्त केली आहे.
We're aware that some of you are having issues accessing your Instagram account. We're looking into it and apologize for the inconvenience. #instagramdown
— Instagram Comms (@InstagramComms) October 31, 2022
आणखी वाचा - Instagram Service Closed: युझर्सचे इन्स्टाग्राम अकाऊंट होतायत बंद? 'हे' आहे कारण
दरम्यान, अनेकांना अकाऊंट लाँगिन करताना प्रॉब्लेम येतोय. तर अनेकांचे फॉलोवर्स देखील घटले आहेत. प्रत्येकाच्या प्रोफाईलमध्ये काही ना काही बदल होताना दिसत आहे.