ट्रकच्या टायरजवळ रबरी झिरमिळ्या का लावतात माहितीये का? डेकोरेशन नाही तर 'हे' आहे खरं कारण

Why Rubber Strips Hang Near Truck Tyres: तुम्हीपण अनेकदा ट्रकच्या टायर्सच्या अगदी जवळ लटक असलेल्या या रबरी झिरमिळ्या पहिल्या असतील. या केवळ डेकोरेशनसाठी असतात असा तुमचा समज असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचा विचार करत आहात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 17, 2023, 07:57 PM IST
ट्रकच्या टायरजवळ रबरी झिरमिळ्या का लावतात माहितीये का? डेकोरेशन नाही तर 'हे' आहे खरं कारण title=
अनेकदा तुम्ही असे ट्रक हायवेवर पाहिले असतील (फोटो सौजन्य - क्वोरावरुन तसेच ब्लॉग चौखट डॉटकॉमवरुन साभार)

Rubber Strips hang near truck tyres: तुम्ही हायवेने प्रवास करताना अनेकदा ट्रक पाहिले असतील. अवजड वाहन प्रकारामध्ये मोडणारे ट्रक हे भारतासारख्या मोठ्या आकाराच्या देशामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अत्यावश्यक सामना पोहचवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. जगातील सर्वात मोठं तिसऱ्या क्रमाकांचं रेल्वेचं जाळं असलेल्या भारतासारख्या देशामध्ये आजही अनेक भागांमध्ये रेल्वेचा विस्तार झालेला नाही. अशा ठिकाणी ट्रकच्या माध्यमातूनच आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये अगदी शेतमालापासून इंधनापर्यंत आणि गॅसपासून ते कच्च्या मालापर्यंत सर्व गोष्टींची ट्रकमधून ने-आण केली जाते. याच ट्रकबद्दल अनेक गोष्टी लोकांना ठाऊक नसतात. त्यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रकच्या मागील बाजूस असलेल्या आडव्या फाळक्याच्या दोन्ही बाजूंना चाकांच्या वरील बाजूस लावलेल्या रबराच्या झिरमिळ्यांसारख्या दिसणाऱ्या पट्ट्या. ट्रक वेगाने जात असेल तर रबराच्या या झिरमिळ्या वाऱ्याबरोबर इकडून तिकडे हलताना दिसतात. मात्र ट्रकच्या मागे या रबरी झिरमिळ्या का लावतात तुम्हाला ठाऊक आहे का? चला यामागील लॉजिक जाणून घेऊयात...

केवळ डेकोरेशन नाही

ट्रकच्या मागील बाजूस रबरी झिरमिळ्या लावण्याचं कारण आज आपण जाणून घेणार आहेत. वेगवेगळे प्रश्न पोस्ट करुन त्यावर चर्चा केली जाणारी सोशल नेटवर्किंग साईट म्हणजे क्वोरा. याच सोशल मीडिया साईठवर एखाद्याला पडलेला प्रश्न पोस्ट केला जातो आणि इतर व्यक्ती वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून किंवा संदर्भ देत त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. काही महिन्यांपूर्वी ट्रकच्या मागे लावल्या जाणाऱ्या झिरमिळ्यांबद्दल असाच एक प्रश्न विचारण्यात आलेला. “एक मालवाहू ट्रकच्या दोन्ही बाजूंना चाकांच्या वरील बाजूस रबराचे बॅण्ड का लटकवलेले असतात?” असा हा प्रश्न होता. या प्रश्नाला अनेकांनी रंजक उत्तर दिली. आपल्यापैकीही अनेकांनी अशाप्रकारे रबर लटकत असल्याचं पाहिलं असेल पण त्यामागील कारण हे केवळ डेकोरेशन नाही.

महिलेनं सांगितलं हे रंजक कारण

काही लोकांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मात्र ही उत्तरं बरोबरच आहेत असं ठामपणे म्हणता येणार नाही. कंचन सिंह नावाच्या एका महिलेने, ‘या रबरी पट्ट्या सामन्यापणे टायर्सच्या जवळ ठेवल्या जातात. जेव्हा टायर फिरतात तेव्हा त्यांचं या पट्ट्यांबरोबर घर्षण होत आणि टायर स्वच्छ आणि साफ होतात. म्हणजेच टायरच्या साइड वॉल स्वच्छ होतात,’ असं म्हटलं आहे.

एकजण म्हणतो, इतर गाड्या जवळून जातात तेव्हा...

मनोज कुमार श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने, “धावणाऱ्या ट्रकच्या सुरक्षेसाठी आणि आजूबाजूने जाणाऱ्या इतर वाहनांच्या सुरक्षेसाठी या रबरी पट्ट्या लावल्या जातात. जेव्हा ट्रक धावत असतो तेव्हा हवेने या रबरी पट्ट्या झुलू लागतात. या फडफडणाऱ्या रबरी पट्ट्यांमुळे ट्रकपासून किमान 1 ते 2 फुटांपर्यंतचं अंतर कव्हर करतात. त्यामुळे इतर वाहने या रबराच्या झुलणाऱ्या पट्ट्या पाहून ट्रकला ओव्हरटेक करण्याआधी ट्रकच्या फार जवळून जात नाही. ओव्हरटेक करणारी वाहनं या रबरी पट्ट्यांचा अंदाज घेऊनच सुरक्षित अंतर ठेऊन बाजूने निघून जातात,” असं म्हटलं आहे. अनेकांनी अशाच प्रकारची उत्तर दिली आहेत. प्रत्येकाने या रबरी पट्ट्यांचं काम काय असतं याबद्दल आपआपल्या परीने लॉजिक सांगितलं आहे. मात्र याचं खरं काम काय आहे हे 99 टक्क्यांहून अधिक लोकांना ठाऊक नसतं.

खरं कारण काय?

अनेक स्रोतांच्या आधारे काढलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या मागील बाजूस या रबरी पट्ट्या लावण्याचं कारण टायर साफ करणे हेच असल्याचं स्पष्ट होतं असं न्यूज 18 ने म्हटलं आहे. टायरवर चिखल किंवा फार माती साठू नये यासाठी या रबरी पट्ट्या उपयोगी ठरतात. मात्र काही दाव्यांनुसार या पट्ट्या केवळ शोभेसाठी आणि ट्रकला रॉ लूक देण्यासाठी लावल्या जातात असं म्हटलं आहे. काही वेबसाईट्सवरील दाव्यांनुसार, प्रचंड प्रमाणात चिखल आणि माती असलेल्या रस्त्यावरुन ट्रक माल वाहून नेतात तेव्हा त्यांचे टायर खराब होतात. हे मागे लावलेले रबर सतत या ट्रकच्या चाकांच्या रिमवर घासून टायर कमी अधिक प्रमाणात स्वच्छ करण्याचं काम करतात.