बाईक चालवताना फोन खिशात ठेवाल तर स्वत:चं मोठं नुकसान कराल

तुम्हालाही बाईक चालवताना फोन खिशात ठेवायची सवय? फोनचं होऊ शकतं मोठं नुकसान

Updated: Sep 15, 2021, 10:15 PM IST
बाईक चालवताना फोन खिशात ठेवाल तर स्वत:चं मोठं नुकसान कराल title=

मुंबई: प्रवासात आपल्याला फोन खिशात ठेवायची सवय असते. विशेषत: बाईक चालवताना पुढच्या खिशात फोन अनेकजण ठेवतात. पण या सवयीमुळे फोनचं मोठं नुकसान होऊ शकतं याची कल्पनाही आपल्याला नसते. एका रिपोर्टनुसार खिशात फोन ठेवून बाईक चालवणं आता फोनसाठी धोकादायक ठरू शकतं. फोनचा कॅमेरा खराब होऊ शकतो असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. 

आपल्या आयुष्याचा स्मार्टफोन हा अविभाज्य भाग बनला आहे. आता हा फोन मल्टिटास्किंगसारखा आपण वापरतो. Apple कंपनीने नुकसाच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात जे कंपनीने म्हटलं आहे ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. आयफोन वापरणाऱ्या युझर्सना तर हा मोठा झटकाच समजला जात आहे.

आयफोननं आपल्या अहवालात म्हटलं आहे की बाईक चालवताना जर तुमच्या खिशात फोन असेल तर त्याचा कॅमेरा खराब होऊ शकतो. बाईकच्या इंजिनमधून निघणाऱ्या विशिष्ट व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीजमुळे आयफोनच्या कॅमेऱ्याला धोका निर्माण होऊ शकतो. 

Apple च्या म्हणण्यानुसार आयफोन कॅमेरा लेन्स जे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (ओआयएस) किंवा क्लोज्ड-लूप ऑटोफोकससह आहेत. बाईक मधून निघणाऱ्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सीजमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अॅपलचा फोन थेट संपर्कात आला तर त्याचं आयुष्य कमी होऊ शकतं आणि त्याच्या कॅमेऱ्याच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होऊ शकतो असंही कंपनीने या अहवालात म्हटलं आहे. 

जे ग्राहक आयफोन आणि बाईक दोन्ही वापरतात अशा लोकांनी काय करायचं? तर कंपनीने त्यांच्यासाठी एक सल्ला दिला आहे. अशा लोकांनी आपला आयफोन एक्स्टेन्डेड हाई-ऐम्पटिट्यूड व्हाइब्रेशन्सपासून दूर ठेवायचा. तर मोबाईलला हॅण्डलवर जोडू नका किंवा बाईकच्या स्टॅण्डवर लावू नका. असे केल्याने व्हायब्रेशन थेट मोबाईलपर्यंत पोहोचतात.