काय आहे iPhone XS चे फिचर्स

आयफोनचा नवा स्मार्टफोन

काय आहे iPhone XS चे फिचर्स

मुंबई : अॅपलने 2018 च्या आयफोन सिरीज लाँच केल्या आहेत. खूप दिवसांपासून आयफोन फॅन्स आतुरतेने वाट पाहत होते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये स्टीव जॉब्स थिएटरमध्ये अॅपल आयफोन XS,XS Max, XR लाँच केलं आहे. iPhone XS एक सामान्य फोन असून XS मॅक्स सर्वात मोठा फोन आहे. तर XR ला सामान्य दरात लाँच केला आहे. 

iPhone XS : स्मार्ट फ्लॅगशिप डिवाइस 

अॅपलच्या नव्या फ्लॅगशिपला iphone XS असं नाव दिलं आहे. या स्मार्टफोनमध्ये 5.8 इंच ओलेड सुपर रेटिना एचडीआर स्क्रिन असून ज्याची पिक्सल डेनसिटी 458 पीपीआय आहे. गेल्या आयफोन 8 प्लसमध्ये 5.5 इंच स्क्रीन दिली आहे. कंपनीच्या या नव्या आयफोनमध्ये 12 मेगापिक्सलला दोन रिअर कॅमेरे असून यूझर्सजवळ वाइल्ड अँगल आणि टेलिफोटो लँस देण्यात आला आहे. रिअर कॅमेरा सेटअप स्टेबिलायजेशन आणि 2 एक्स ऑप्टिकल झूम आणि डेप्थ कंट्रोल पोर्ट्रेट मोड फिचरसोबत आहे. फोनमध्ये सेल्फी करता अपर्चर एफ/2.2 सोबत 7 मेगापिक्सल आरजीबी सेंसर मिळतो.  

आयफोन XS ची किंमत 

64 जीबी आयफोन XS ची किंमत 999 डॉलर म्हणजे 71,800 रुपये, 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,149 डॉलर म्हणजे 82,600 रुपये आणि 512 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,349 डॉलर म्हणजे 97,000 रुपये आहे. 

आयफोन XS सिल्वर, गोल्ड आणि स्पेस ग्रे रंगाचे उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन आयपी 68 रेटिंगसोबत येणार असून 2 मीटर पर्यंत हा फोन पाण्यात गेला तरी काही फरक पडणार नाही. स्मार्टफोनसाठी 14 सप्टेंबर शुक्रवारपासून प्री बुकिंग सुरू होणार असून 21 सप्टेंबरला बाजारात मिळणार आहे.