नवी दिल्ली : कोरोना संसर्गादरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. बेरोजगारीमुळे तरुणाईला अर्थकारण चालवणे अडचणीचे झाले होते. परंतु IT आणि BPM क्षेत्राने तरुणांसाठी नोकरीचे दरवाजे खुले केले आहेत. जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
IT - BPM इंडस्ट्रीला चालू आर्थिक वर्षातील उत्तरार्धात म्हणजेच 2022 मध्ये 4.8 Million कर्मचाऱ्यांच्या भरतीचे लक्ष्य पूर्ण करायचे आहे. त्यासाठी इंडस्ट्रीला 3.75 लाख कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची गरज आहे. टीमलीज डिजिटलच्या एका रिपोर्टनुसार 3.75 लाख कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
IT-BPM इंडस्ट्रीने पुढील पाच वर्षात 10 मिलियन कर्मचाऱ्यांची नियुक्तीचे लक्ष्य ठेवले आहे. इंडस्ट्रीजकडून येत्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी उमेदवारांकडे डिजिटल स्किल्स असणे गरजेचे आहे.