itel Flip One Price in India: itel ने भारतीय बाजारात नवा फोन लाँच केला आहे. हा एक बजेट फ्लिप फोन आहे. कंपनीने itel Flip One ला लाँच केलं आहे, जो एक की-पॅड फिचर फोन आहे. हा फोन आकर्षक डिझाइनसह येतो. यामध्ये प्रीमियम लेदर बॅक आणि ग्लास कीबोर्डवालं डिझाईन देण्यात आलं आहे.
या फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच 1200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा हँडसेट सिंगल चार्जमध्ये 7 दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करतो. या मोबाईलमध्ये नेमके फिचर्स काय आहेत, तसंच किती किंमत आहे? जाणून घ्या.
itel Flip One फक्त एकाच कॉन्फिग्रेशनमध्ये येतो. या हँडसेटची किंमत 2499 रुपये आहे. हा मोबाईल लाईट ब्ल्यू, ऑरेंज आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. हा फिचर फोन तुम्ही कंपनीच्या अधिकृत रिटेल स्टोअरमधून खरेदी करु शकता. या मोबाईलसह एक वर्षांची वॉरंटी मिळते.
हा फोन दिसण्यास फार आकर्षक आहे. एक वेळ होती जेव्हा फ्लिप मोबाईल फोनचा ट्रेंड होता. तो ट्रेंड आता पुन्हा नव्याने आला आहे. अशा स्थितीत कंपनी अशा ग्राहकांना टार्गेट करत आहे ज्यांना कमी पैशात फ्लिप मोबाईल खरेदी करण्याची इच्छा आहे.
itel Flip One फ्लिप डिझाइनसह येतो. याच्या मागील बाजूला लेदर टेक्स्चरचा वापर करण्यात आला आहे. तर फ्रंटला ग्लास कीपॅड मिळतो. या बजेट फोनमध्ये USB Type-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले मिळतो.
यामध्ये King Voice चं फिचर मिळतं, जे फोनचं वॉईस असिस्टंट आहे. या फोनमध्ये ब्ल्यूटूथ कॉलिंग फिचरही आहे. म्हणजे हा फोन तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट करुन कॉलिंग करु शकता. हे डिव्हाइस 13 भाषांना सपोर्ट करतं.
itel Flip One मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. फोनमध्ये सिंगल VGA कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये FM Radio देखील मिळतो. यामध्ये 1200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन सिंगल चार्जमध्ये 7 दिवसांची बॅटरी लाईफ देतो.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read MoreBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.