आयटेलने लॉन्च केले दोन नवीन स्मार्टफोन्स...

चायनीज मोबाईल कंपनी आयटेलने मंगळवारी भारतीय बाजारात तीन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले. या स्मार्टफोनची किंमत ९००० पेक्षा कमी आहे.  एस42 (S42), ए44 (A44)हे स्मार्टफोन्स लॉन्च करण्यात आले. 

Updated: Mar 20, 2018, 04:46 PM IST
आयटेलने लॉन्च केले दोन नवीन स्मार्टफोन्स... title=

नवी दिल्ली : चायनीज मोबाईल कंपनी आयटेलने मंगळवारी भारतीय बाजारात तीन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले. या स्मार्टफोनची किंमत ९००० पेक्षा कमी आहे.  एस42 (S42), ए44 (A44)हे स्मार्टफोन्स लॉन्च करण्यात आले. 

एस42 (S42)

एस42 मध्ये ५.६५ इंचाचा फूल एचडी स्क्रीन, अॅनरॉईड ओरीयो ८.० आणि स्नॅपड्रेगन ४२५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट आणि रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत. फोनमध्ये फेस लॉकची सुविधा आहे. त्याचबरोबर 3 GB रॅम आणि 16 GB  ची
 इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून तुम्ही ती  128 GB पर्यंत वाढवू शकतो. या फोनमध्ये 3,000 एमएएच पॉवरफुल बॅटरी आहे. याची किंमत 8,799 रुपये आहे.

ए44

ए44 मध्ये 5.45 इंचाची फुल एचडी स्क्रीन, अॅनरॉईड नोगट ७.० मीडियाटेक क्वाडकोर प्रोसेसर आणि 1 GB ची रॅम देण्यात आली आहे. 5 मेगापिक्सल चा फ्रंट आणि रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. 8 GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून ती 32 GB पर्यंत वाढवता येईल. 2,400 एमएएच ची बॅटरी असलेल्या या फोनची किंमत 5,799 रुपये आहे. यात फिंगरप्रिंट सेंसरची सुविधा देण्यात आली आहे.