मुंबई: एअरटेल आणि वोडाफोनला टक्कर देण्यासाठी जिओ कंपनी नवनवीन प्लॅन आणत आहे. जिओने ग्राहकांसाठी खास वर्क फ्रॉम होम प्लॅन देखील आणले ज्यामध्ये 21 आणि 51 रुपयांमध्ये 2 आणि 6 जीबी डेटा ग्राहकांना वापरायला मिळतो आहे. तर जिओने 399 रुपयांचा प्लॅन आणला होता. याआधी 199 चा प्लॅन केवळ पोस्टपेड ग्राहकांसाठी आणण्यात आला होता.
प्रीपेडमध्ये देखील 199 रुपयांचा प्लॅन जिओने लाँच केला आहे. मात्र जास्त फायदा मिळवून देणारा प्लॅन 199 रुपयांचा हा पोस्टपेड आहे कसा तो आजच जाणून घेऊया. तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुम्हाला या प्लॅनचा फायदा होऊ शकतो.
जिओ तुम्हाला 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये बिल सायकल वॅलिडिटी ऑफर देत आहे. बिल सायकल 28 दिवसांचं असतं. यामध्ये कंपनीकडून 25 GB हायस्पीड डेटा आणि तो डेटा संपल्यानंतर 20 रुपये प्रती GB अशी ऑफऱ त्यांनी दिली आहे. याशिवाय वॉइस कॉल आणि 100 sms दरदिवशी तुम्हाला मिळणार आहेत. यासोबतच जिओचे सर्व अॅप्स तुम्ही मोफत वापरू शकणार आहात.
199 प्रीपेड प्लॅन देखील बेस्ट सेलर आहे. कंपनीने या प्लॅनमध्ये देखील 28 दिवसांच्या वैधतेसह 42 gb हायस्पीड डेटा दिला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग 100 sms आणि 1.5 GB डेटा प्रतिदिवशी अशा सेवा ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे हा प्लॅन ग्राहकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.