Jio चा स्वस्त आणि मस्त सुपरफास्ट इंटरनेट प्लान, Airtel-BSNL च्या तुलनेत चांगले फायदे

जियो, एअरटेल आणि बीएसएनएलचे चांगले ब्रॉडब्रँड प्लान्स आहेत. मात्र यातही जियोने बाजी मारली आहे.

Updated: Aug 24, 2022, 12:52 PM IST
Jio चा स्वस्त आणि मस्त सुपरफास्ट इंटरनेट प्लान, Airtel-BSNL च्या तुलनेत चांगले फायदे title=

Jio Superfast Internet Plan: कोविडच्या लाटेनंतर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरु केलं होतं. कोविड संसर्गाचा जोर ओसरला असला तरी अनेक कंपन्यांचे कर्मचारी आजही वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे घरात ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी वाढली आहे. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षणासाठी वायफायच्या मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यासाठी जियो, एअरटेल आणि बीएसएनएलचे चांगले ब्रॉडब्रँड प्लान्स आहेत. मात्र यातही जियोने बाजी मारली आहे. 100mbps स्पीड असलेल्या प्लानसाठी जियो ग्राहकांना कमी पैसे मोजावे लागत आहेत. इतर ब्रॉडबँड कंपनीच्या तुलनेत कसं स्वस्त आहे ते जाणून घेऊयात..

BSNL 100mbps Broadband Plan: बीएसएनएल भारत फायबर ब्रॉडबँडद्वारे ग्राहकांना 100mbps इंटरनेट स्पीड प्लान ऑफर करते. बीएसएनएलद्वारे ऑफर केलेल्या दोन मासिक प्लानचा ग्राहकांसमोर पर्याय आहे: फायबर सुपरस्टार प्रीमियम आणि फायबर व्हॅल्यू असे दोन प्लान आहेत. एका महिन्याच्या टॅरिफ प्लानची ​​किंमत 749 ते 799 रुपये आहे. FUP डेटा कॅप फायबर सुपरस्टार प्रीमियम प्लॅनसाठी 1000GB आणि फायबर व्हॅल्यू पॅकसाठी 3300GB वर सेट केली आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नसल्याने पॅक खरेदी केल्यावर ग्राहकांकडून जीएसटी आकारला जाईल. फायबर सुपरस्टार प्रीमियम पॅकेजमध्ये सोनी LIV, ZEE5, Voot आणि इतरांसह काही OTT सेवांचे सदस्यत्व देखील समाविष्ट आहे.

Airtel 100 Mbps broadband plan:एअरटेल विविध हाय-स्पीड ब्रॉडबँड योजना ऑफर करते. फायबर ऑप्टिक इंटरनेट कनेक्शनसह कमी बफरिंग आणि जलद डाउनलोड गती आहे. एअरटेलचा "स्टँडर्ड" पॅक 100mbps ब्रॉडबँड सेवा देते. या प्लानची ​​किंमत कर वगळून 799 रुपये प्रति महिना आहे. या प्लानसाठी 3300GB FUP डेटा कॅप सेट करण्यात आली आहे. याशिवाय युजर्संना विंक म्युझिक, एक्सस्ट्रीम प्रीमियम, अपोलो 24/7 आणि FASTag वर विनामूल्य एक्सेस आहे.

JioFiber 100mbps plan: जियो फायबर 699 रुपये प्रति महिना 100mbps इंटरनेट स्पीड डेटा प्लान देते. जियो फायबरच्या 100mbps पॅकेजसह अनेक उपकरणांवर ग्राहक जलद इंटरनेट मिळवू शकतात. या प्लानच्या किमतीत जीएसटी समाविष्ट नाही. युजर्स त्यांच्या गरजेनुसार तीन महिन्यांसाठी, सहा महिन्यांसाठी किंवा वर्षभरासाठी प्लान खरेदी करू शकतात. या प्लानसह, वापरकर्त्यांना दरमहा 3.3TB हाय-स्पीड डेटा मिळतो.