Jio ची भन्नाट ऑफर, ग्राहकांची प्लॅन खरेदीसाठी तुफान गर्दी

बापरे! इतक्या दिवस फ्री मिळणार INTERNET, जाणून घ्या जिओची ऑफर

Updated: Aug 12, 2022, 02:01 PM IST
Jio ची भन्नाट ऑफर, ग्राहकांची प्लॅन खरेदीसाठी तुफान गर्दी  title=

मुंबई : देशभरात स्वातंत्र्याची 75  वर्षे साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त नागरीकांमध्ये एक वेगळाच उत्साह असताना, हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी जिओने ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफऱमध्ये जिओने ग्राहकांना फ्री इँटरनेट देण्याची घोषणा केली आहे.  या घोषणेनंतर ग्राहकांची ऑफर खरेदीसाठी एकचं गर्दी जमलीय. 

रिलायन्स जिओने इंडिपेंडेंस डे ऑफरमध्ये 3 अनोख्या ऑफऱची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर 3000 रुपयांच्या फायद्यांसह 'जिओ फ्रीडम ऑफर', 750 रुपयांच्या प्लॅनमध्ये 
90 चा अनलिमिटेड प्लॅन' आणि 'हर घर तिरंगा, हर घर जिओ फायबर' ऑफर जी 15 दिवसांच्या फायद्यांसह मिळणार आहे.  

ऑफर काय?
'हर घर तिरंगा, हर घर JioFiber' नवीन JioFiber कनेक्शन खरेदी करणाऱ्या सर्व नवीन ग्राहकांसाठी असणार आहे. त्यांना 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान JioFiber पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅन घ्यावा लागेल. ही ऑफर फक्त त्या लोकांसाठी आहे जे नवीन प्लॅन घेतील. या ग्राहकांना खरेदी केलेल्या प्लॅनवर अतिरिक्त 15 दिवसांचा लाभ मिळेल. 

ऑफर कशी मिळवायची?
जर तुम्हाला ही ऑफर मिळणार असेल तर तुम्ही जिओचे नवीन ग्राहक असणे आवश्यक आहे. तुम्हाला पोस्ट पेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅन घ्यावा लागेल. ही ऑफर फक्त Rs 499, Rs 599, Rs 799 आणि Rs 899 च्या प्लॅनसाठी लागू आहे. जर तुम्हाला 15 दिवसांसाठी मोफत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान हा प्लॅन घ्यावा लागेल. 19 ऑगस्टपर्यंत प्लॅन अॅक्टीव्ह होईल. पण या जर ही ऑफर तुम्ही 6 महिने किंवा वर्षभरासाठी घेतली असेल तरच मिळेल.