जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा मोठी धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे.

Updated: Jul 18, 2017, 05:08 PM IST
जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर title=

मुंबई : रिलायन्स जिओने पुन्हा एकदा मोठी धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना नवीन नवीन ऑफर सादर करीत आहे. यामध्ये जिओने आणखी एक ३४९ रुपयांचा प्लान आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांपर्यंत अनलिमिटेड 4 जी इंटरनेट आणि फोन कॉल्स सुविधा मिळतील.

युजरला यामध्ये 20 जीबी डेटा मिळेल. युजरवर आहे त्याने डेटा कसा वापरावा. एकाच दिवशी पूर्ण 20 जीबी डेटा देखील वापरु शकतो किंवा 56 दिवसांपर्यंत देखील वापरु शकतो. दिवसाला १ जीबी ४जी डेटा मिळेल. त्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होईल. परंतू इंटरनेट अनलिमिटेड चालू राहील. स्पीड फक्त 128 केबीपीएस होईल.

जिओने 309 रुपयांच्या रिचार्जमध्ये थोडा बदल केला आहे. यामध्ये आता यूजर्सला 56 दिवसांची वैधता मिळत आहे. शिवाय रोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल सुविधा मिळत आहे. रोज 4 जी 1 जीबी डेटा मिळेल. रोजचा डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 128 केबीपीएस होईल. हा प्लॅन जिओच्या प्राईम मेंबरर्ससाठी आहे.