व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, चॅटिंग करताना मिळणार हा पर्याय

गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅप तुमच्या आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे.

Updated: Aug 27, 2018, 04:00 PM IST
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी खुशखबर, चॅटिंग करताना मिळणार हा पर्याय

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅप तुमच्या आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे. व्हॉट्सअॅपचे भारतामध्ये जवळपास २० कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप नेहमीच त्यांच्या फिचर्समध्ये बदल करत आलंय. फेक न्यूज थांबवण्यासाठी व्हॉट्सअॅपनं काही पावलं उचलली. यासाठी कंपनीनं फॉरवर्ड मेसेज फिचर एनेबल केलं. यानंतर आता व्हॉट्सअॅप भारतीयांसाठी खुशखबर घेऊन आलीये. भारतातल्या १० भाषांमध्ये व्हॉट्सअॅप उपलब्ध आहे. यामध्ये इंग्रजीशिवाय हिंदी, बंगाली, पंजाबी, तेलगू, मराठी, तामिळ, उर्दू, गुजराती, कन्नड आणि मल्याळम भाषांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅपची भाषा बदलण्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन काही बदल करावे लागणार आहेत. पण सगळ्या फोनमध्ये हा पर्याय असणार नाही. तुमचा फोन लँग्वेज रीड करत असेल तरच तुम्हाला हे फिचर वापरण्यात येईल.

भाषा कशी बदलाल?

१ तुमचं व्हॉट्सअॅप उघडा

२ मेन्यू बटणवर जा

३ सेटिंग्सजमध्ये जा

४ चॅट ऑप्शनवर जाऊन ओपन अॅप लँग्वेज सिलेक्ट करा

५ आता तुम्ही तुम्हाला हवी असलेली भाषा निवडू शकता

जर यूजरनं त्याच्या फोनची भाषा बदलली तर व्हॉट्सअॅपही त्याच भाषेत काम करेल. म्हणजेच तुम्ही फोनची भाषा मराठी ठेवलीत तर व्हॉट्सअॅपही मराठी भाषेत दिसेल. पण फक्त व्हॉट्सअॅपची भाषा बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये बदल करावे लागतील

ऍन्ड्रॉईड फोनसाठी काय कराल?

१ सगळ्यात आधी सेटिंग्जमध्ये जा 

२ लँग्वेज अॅन्ड इनपूटवर क्लिक करा 

३ लँग्वेजच्या ऑप्शनवर जा 

४ तुमची आवडती भाषा निवडा 

५ आता तुमचं व्हॉट्सअॅप तुम्हाला हव्या त्या भाषेत काम करेल

आयफोनसाठी काय कराल?

१ सगळ्यात आधी सेटिंग्जमध्ये जा 

२ जनरल टॅबवर क्लिक करा 

३ लँग्वेज अॅन्ड रीजनवर जाऊन क्लिक करा 

४ आयफोन लँग्वेजचा ऑप्शन सिलेक्ट करा 

५ तुमची आवडती भाषा निवडा 

६ आता तुमचं व्हॉट्सअॅप तुम्ही निवडलेल्या भाषेत काम करेल