मुंबई : लोन अॅप्सप्रकरण आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं आहे. गृहविभाग यासंदर्भात इंटरपोलची मदत घेण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या माध्यमातून हे प्रकरण इंटरपोलकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोन अॅप्सच्या माध्यमातून फसवणूक करणारे नेपाळमधून आपल्या कारवाया करत असल्याची चर्चा आहे. यात ग्राहकांची फसवणूक करून मिळणारे पैसे हे चीनकडे वळवले जात असल्याचं उघड झालंय. राज्यात लोन अॅप्ससंदर्भात तब्बल 1800 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
अॅप्सद्वारे झटपट लोन देऊन मग वसुलीसाठी धाकदपटशा आणि ब्लॅकमेलिंग सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. आता यात इंटरपोलची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.
आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत, जे छोट्या मोठ्या रकमेसाठी कर्ज घेतात. परंतु बॅकेतून एक दोन हजार रुपयांच्या कर्जासाठी देखील बरीच प्रोसिजर असते. तसेच याला वेळ देखील लागतो. परंतु आता बाजारात असे बरेच अॅप्स लाँच झाले आहेत, जे आपल्याला कमी कालावधीसाठी आणि कमी पैशांसाठी लोन देतात.
शिवाय या लोन अॅप्ससाठी जास्त डॉक्यूमेंट्सची गरज भासत नाही. तसेच अगदी काही तासातच लोकांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतात. ज्यामुळे बरेचसे लोक या अॅप्सचा वापर करतात. परंतु तुम्हाला माहितीय का, की याच गोष्टीचा फायदा घेत काही फ्रॉड कंपन्या देखील बाजारात उतरल्या आहेत.
हो हे खरं आहे तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती नुसतं कॅश किंवा लोन टाकलंत, तरी देखील तुम्हाला अनेक असे अॅप्स सजेशन दिसतील. परंतु त्यांपैकी सगळेच अॅप हे खरे असतीलच असे नाही.
खरंतर या संदर्भात एक प्रकरण समोक आलं आहे. ज्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे, हे तुमच्या लक्षात येईल.