मारुती IGNIS कारच्या डिझेल व्हेरिएंटचं प्रोडक्शन बंद

... म्हणून कंपनीने घेतला हा निर्णय

Updated: Jun 15, 2018, 02:10 PM IST
मारुती IGNIS कारच्या डिझेल व्हेरिएंटचं प्रोडक्शन बंद title=
File Photo

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुजुकीने आपली युनिक डिझाईन असलेल्या इग्निस (डिझेल) कारचं प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुजुकीच्या मारुती इग्निस कारच्या डिझेल व्हेरिएंटची मागणी खूपच घसरली होती. त्यामुळे कंपनीने इग्निस कारचं डिझेल व्हेरिएंट बद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मारुती सुजुकी इग्निस कारच्या डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.3 लिटर DDiS, 4 सिलिंडर इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 73 बीएचपी पावर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करतं. इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी ट्रान्समिशनचे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. 

मारुती इग्निस गाडीच्या डिझेल व्हेरिएंटची विक्री ही एकूण गाड्यांच्या विक्रीत केवळ 10 टक्के राहीली आहे. तर, 90 टक्के विक्री पेट्रोल मॉडलची झाली आहे. मारुती इग्निस ही कार भारतीय बाजारात पहिल्यांत जानेवारी 2017 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. 

मारुती इग्निसमध्ये ड्युअल एअरबॅग्स, एबीएस, 15 इंच अलॉय व्हिल्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, मिरर लिंक, स्मार्टफोन कनेक्टिविटी देण्यात आली आहे. 

मारुती इग्निस गाडीचं डिझंल व्हेरिएंट बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असला तरी पेट्रोल व्हेरिएंटचं प्रोडक्शन आणि विक्री मात्र सुरुच राहणार आहे.