Maruti Suzuki च्या 'या' गाडीची मागणी वाढली, आता बूक केली तर सहा महिन्यांनी मिळणार

भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. कंपनीने अलीकडेच अपडेटेड मॉडेल लाँच केलं आहे. या गाडीचा परफॉर्मन्स पाहता मागणी वाढली आहे.  पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्यानं वेटिंग पिरीयड वाढला आहे. त्यामुळे मारुती सुझुकीची गाडी आज बूक केली तर सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.

Updated: Oct 13, 2022, 06:22 PM IST
Maruti Suzuki च्या 'या' गाडीची मागणी वाढली, आता बूक केली तर सहा महिन्यांनी मिळणार title=

Maruti Brezza SUV Demand: भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. कंपनीने अलीकडेच अपडेटेड ब्रेझा लाँच (Maruti Suzuki Brezza) केली आहे. या गाडीचा परफॉर्मन्स पाहता मागणी वाढली आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्यानं वेटिंग पिरीयड वाढला आहे. त्यामुळे मारुती सुझुकी आज बूक केली तर सहा महिने वाट पाहावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात या कारचे 15,445 युनिट्स विकले गेले आहेत. गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. त्याचबरोबर या गाडीली 75 हजारांपेक्षा जास्त बुकिंग मिळालं आहे. ही कार Lxi, Vxi, Zxi आणि Zxi+ या चार ट्रिममध्ये उपलब्ध आहे. ही 1.5-लिटर K15C पेट्रोल इंजिनसह माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे. इंजिन 103PS पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील आहे आहे. 

मारुती सुझुकी LXI प्रकारासाठी मॅन्युअल ट्रान्समिशन पेट्रोल मॉडेलची किंमत 7.99 लाख रुपये इतकी आहे.ZXi ड्युअल टोन मॉडेल 11.03 लाख रुपये, VXi मॉडेल 9.47 लाख , ZXI मॉडेल 10.87 लाख रुपये,  , ZXi+ मॉडेल 13.46 लाख रुपयांना उपलब्ध आहे. मारुती सुझुकी ब्रेझामध्ये 9 इंचाचा टचस्क्रिन, डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, सनरूफ, शार्क फिन अँटेना असे फिचर्स देण्यात आले आहेत.

Diwali Offer: फक्त 1 रुपयात घ्या Honda Bike आणि कॅशबॅक मिळवा, EMI भरताना व्याजाचं No Tension

सप्टेंबर महिन्यात देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV बद्दल बोलायचं झालं तर टाटा नेक्सन आणि ह्युंदाई क्रेटा यांचा क्रमांक लागतो. टाटा नेक्सॉनच्या एकूण 14,518 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 9,211 युनिट्सची विक्री झाली होती. त्याच वेळी, ह्युंदाई क्रेटाने सप्टेंबरमध्ये 12,866 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 8,193 युनिट्सची विक्री केली होती.