मारूती सुझुकी सिलेरिओ एक्स भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत

मारूती सुझुकी इंडियाने भारतात नवीन स्पोर्टी लुक असलेली सिलेरिओ एक्स हॅचबॅक कार लॉन्च केली आहे.

Updated: Dec 2, 2017, 02:47 PM IST
मारूती सुझुकी सिलेरिओ एक्स भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत title=
Image Credit NDTVAuto.com

नवी दिल्ली : मारूती सुझुकी इंडियाने भारतात नवीन स्पोर्टी लुक असलेली सिलेरिओ एक्स हॅचबॅक कार लॉन्च केली आहे. हे सिलेरिओ स्पोर्टी कारचं हॅचबॅक व्हर्जन असून स्टाईल आणि लुक क्रॉसओव्हरसारखं आहे. या नव्या सिलेरिओमध्ये लुक्स बोल्ड आहे आणि यात रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत काही कॉस्मेटीक बदल करण्यात आले आहेत. 

केवळ पेट्रोल इंजिन

ही कार केवळ पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध होईल. याचे चार व्हेरिएंट्स VXI, VXI (O), ZXI और ZXI (O) हे आहेत. हे सर्वच व्हेरिएटंस मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक दोन्ही पर्यायांमध्ये असतील.

इंजिन कसं आहे?

मारूती सुझुकीने कारच्या इंजिनमध्ये काहीच बदल केला नाहीये. यात 998cc चं ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन कायम ठेवण्यात आलं आहे. हे इंजिन ६७ बीएचपी पावर आणि ९० एमएम टॉर्क जनरेट करतं. कंपनीने इंजिनला ५ स्पीड मॅन्युअल आणि ५ स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशन दिलं आहे. 

कसा आहे लुक?

सिलेरिओच्या नव्या मॉडलेच्या अप फ्रंटबाबत सांगायचं तर तो खूप बोल्ड आणि आणि यात ब्लॅक एलिमेंटचा खूप वापर करण्यात आलाय. सिलेरिओ एक्समध्ये प्लास्टीक क्लॅडींग सुद्धा देण्यात आलीये. या कारमध्ये ब्लॅक रेडिएटर ग्रिल आणि एअर डॅम दिलं गेलंय. बम्पर नवीन आहे. फॉगलॅम्पस वाढवण्यात आले आहेत. ही कार चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असेल. 

इंटेरिअर डिझाईन कसं आहे?

कारचं इंटेरिअर आल ब्लॅक थिमवर तयार करण्यात आलंय. सीट कव्हर्स काळया रंगांचे आहेत आणि यात नारंगी रंगाचाही वापर करण्यात आलाय. सुरक्षेसाठी यात ड्रायव्हर साईडला एअरबॅग्स आणि ड्रायव्हर सीटबेल्टही सर्वच व्हेरिएंटमध्ये देण्यात आलंय. 

किती आहे किंमत?

मारूतीने या नव्या सिलेरिओ व्हर्जन कारची किंमत ४.५७ लाख रूपये ते ५.४२ लाख रुपये दरम्यान ठेवली आहे.